

आमदार बाबाजी काळे ओचित्त्याच्या मुद्द्यावर बोलताना म्हणाले की, भीमाशंकरला अ दर्जा दिल्यास या भागात पायाभूत सुविधांचा विकास, शाश्वत पर्यटनाला चालना आणि या स्थळाचे संवर्धन शक्य होणार आहे. या संदर्भात त्यांनी सरकारच्या आणि शासनाचे निदर्शनास विविध बाबी आणून दिल्या. तसेच भीमाशंकरचे एक प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणून महत्त्व आणि पर्यटनाद्वारे आर्थिक विकासाची त्याची क्षमता लक्षात घेता हा विचार करणे आवश्यक आहे. सद्या क वर्ग दर्जा आहे. तो अ वर्ग दर्जा देण्यात यावा अशी मागणी करत आमदार बाबाजी काळे यांनी पर्यटन मंत्र्यांना या प्रकरणाकडे लक्ष देण्याची विनंती केली.
रायगड खांडस ते भीमाशंकर रोपवे
आमदार बाबाजी काळे यांनी सरकारला या संदर्भात त्वरित कारवाई करण्याची आणि प्रसाद योजने अंतर्गत केंद्र सरकारला प्रस्ताव सादर करण्याची विनंती केली. या मुळे रायगड खांडस ते भीमाशंकर रोप वे सह अन्य घोरणात्मक कामे मार्गी लागतील. श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे येणाऱ्या भाविकांना ,पर्यटकांना याचा लाभ होईल. त्यामुळे या संदर्भात केंद्र शासनास तातडीने प्रस्ताव सादर करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
खेड तालुक्यातील धार्मिक स्थळांचा विकास व्हावा
खेड तालुक्यातील खालील धार्मिक स्थळांचा विकास व पर्यटनाच्या माध्यमातून सुशोभीकरण व्हावे, यामध्ये १ शिंगीचा डोंगर, २ गुंडाळवाडीजवळील शंभू महादेव मंदिर, ३ वाडा येथील गडदूदेवी, आनंदी आईमंदिर, ४ भोसे येथील तुकाई मंदिर, ५ सौरंग्या दत्त मंदिर, ६ साबळेवाडी बुद्रुक येथील अंबिका मंदिर, ७ चासटोकेवाडी पंचवटी जवळील सुशोभीकरण करणे. या साठी शासनाने विशेष लक्ष घालून व पर्यटनाच्या माध्यमातून या भागाचा विकास करावा अशी मागणी आमदार बाबाजी काळे यांनी केली आहे.