

दि.१९/०७/२०२५ रोजी रात्री ००/२० वा. सुमारास मी महींद्रा कंपणी गेट नंबर २ निघोजे येथून फिर्यादी हे काम न मिळाल्यामुळे सुभाषवाडी येथे पायी परत जात असताना आल्ट्रा कंपणी निघोजे जवळ आले असताना समोरून सुभाषवाडी कडुन पांढ-या रंगाच्या बुलेट गाडीवर आलेल्या अज्ञात दोघांनी माझ्या जवळ येवुन माझ्या हातामधील माझा पांढ-या रंगाचा आय फोन जबरदस्तीने हिसकावून घेवुन चोरी करून पळून गेले तसेच अक्षय जाधव याचा ओप्पो कंपनीचा काळ्या रंगाचा मोबाईल देखील त्यांनी जबरदस्तीने काढून घेवुन पळून जात असताना महाळुंगे पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार शशिकांत होले व प्रवीण बाबळे यांनी सीताफिने पाठलाग करून ताब्यात घेतले मी पोलीस स्टेशनला गेलो असता तेथून मला आरोपींची नावे १) सुनील धनराज पाटील वय ३० वर्ष रा देहूगाव जेन मंदीरा जवळ ता. मावळ जि.पुणे २) विशाल रविंद्र बोरसे वय २६ वर्ष रा. चाळीसगाव जि. जळगाव
अशी समजली सदर आरोपींना मी ओळखून तशी फिर्याद दिल्याने महाळुंगे पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला आहे