
जय मल्हार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय दौलतनाना शितोळे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त स्वप्नवेध अनाथालय मंगरूळ याठिकाणी लहान लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आला, आपल्या आवडत्या राजकीय नेत्यांचा वाढदिवस साजरा करत असताना लाखो रुपये खर्च केला जातो परंतु तो खर्च योग्य ठिकाणी केला तर खूप वेगळा आनंद मिळतो याच हेतुने जय मल्हार क्रांती सेनेचे नगर जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब शिरतर यांनी दौलत नाना शितोळे यांचा वाढदिवस स्वप्नवेध अनाथालय येथे साजरा करून एक वेगळा आदर्श उभा केला आहे त्या वेळी उपस्थित जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य श्री बाळासाहेब शिरतार अन्याय निवारण समिती महाराष्ट्र राज्य श्री शंकर गोफणे सर जय मल्हार क्रांती संघटना पुणे जिल्हा अध्यक्ष यांनी मनोगत व्यक्त केले बोलताना ते म्हणाले की स्वप्नवेधचे कार्य हे कौतुकास्पद असून प्रत्येकाने आपले वाढदिवस स्वप्नवेध अनाथालय येथे साजरा करून या लेकरांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करावा गोफने सर यांनी आपले विचार मांडत असताना स्वप्नवेध अनाथालयात येऊन आवश्यक असणाऱ्या किराणा किंवा आवश्यक असणाऱ्या गोष्टी देऊन स्वप्नवेधच्या कार्याला एक हात पुढे करणे काळाची गरज आहे असे मत व्यक्त केले त्या वेळेस प्रमुख उपस्थित श्री रामदास साळवे अण्णाभाऊ साठे क्रांती सेना तालुका अध्यक्ष श्री.विलास विश्वे चम॔कार संघटना तालुका अध्यक्ष जुन्नर ग्रामपंचायत सदस्य पारगाव श्री.बाळासाहेब गुजर माजी सरपंच पाडळी आळे श्री बाळासाहेब जाधव सामाजिक कार्यकर्ते श्री गणेश गोफणे युवा उद्योजक श्री कैलाश गुंजाळ जेष्ठ मार्गदर्शक सुभाष गोफणे श्री सचिन भोजणे स्वप्नवेध अनाथाश्रम संस्थापक अध्यक्ष मंगल भोजणे श्री.संदीप शितोळे जय मल्हार क्रांती संघटना जुन्नर तालुका प्रसिद्धी प्रमुख तसेच कार्यक्रमाचे आभार गणेश गणेश गोफणे यांनी मानले*