

आळंदी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 259/2021 भा.द.वि. कलम 307,504,506 प्रमाणे आरोपी नामे संतोष वासुदेव घुंडरे वय 35 वर्ष रा.प्रदक्षिणा रोड आळंदी ता. खेड जि.पुणे याचे विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचे तपासी अधिकारी सपोनि न्यामने, दुयम तपासी अधिकारी श्री बी एम जोंधळे यांनी गुन्हयाचे तपास करूनआरोपीविरूध्द सबळ पुरावा प्राप्त करून दोषारोप पत्र मा.अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय राजगुरूनगर येथील न्यायालयात दाखल करण्यात आले होते.सदर सेशन केसमध्ये साक्षीदार यांची तपासणी मा. सरकारी अभियोक्ता श्री पांडकर यानी घेतली, तसेच कोर्ट पैरवी अंमलदार यांनी वेळोवेळी साक्षीदार हजर करून मदत केली. मा. अतिरिक्त सत्र न्यायालय, राजगुरूनगर, खेड यांनी गुन्हयातील आरोपी संतोष वासुदेव घुंडरे याचे विरूद्ध सबळ पुरावा उपलब्ध झाल्याने दाखल गुन्हयात आरोपीस 1) भादवि कलम 307 अन्वये 7 वर्षे सक्त मजुरी व 1 लाख रूपये दंड व दंड न भरल्यास 1 वर्ष साधा कारावास 2) भादवि कलम 506 अन्वये 1 वर्ष सक्त मजुरी व 1,000/- रूपये दंड न भरल्यास महिना साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. सदर आरोपी यास येरवडा जेल येथे जमा करण्यात आलेले आहे.
सदर गुन्हयाचा तपास व सुनावणीकामी आवश्यक असलेल्या पुराव्याचे कारवाईबाबत मा.पोलीस आयुक्त, श्री विनयकुमार चौबे, मा. सह पोलीस आयुक्त, डॉ. शशिकांत महावरकर, मा. अपर पोलीस आयुक्त श्री सारंग आवाड, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 3. श्री बापु बांगर, मा. सहा. पोलीस आयुक्त, चाकण विभाग श्री राजेंद्रसिंह गौर, पिंपरी चिंचवड शहर यांचे मार्गदर्शनानुसार आम्ही स्वताः तसेच तपासी अधिकारी सपोनि एन.एस.न्यामने, दुयम अधिकारी यांनी कामकाज पाहीले आहे.
पोसई श्री बी एम जोंधळे, कोर्ट पैरवी मपोशि/2592 गावडे, पोलीस दिलदार/मोहीते असे