
चाकण प्रतिनिधी लहू लांडे
श्री क्षेत्र कुंडेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता अरुंद, तीव्र चढ उताराचा,अवघड वळणाचा असल्यामुळे मोठ्या वाहनांना वळणावर टर्न घेणे अवघड आहे आणि साईडला साईड सुरक्षा पट्टी नसल्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव मोठी वाहने,ट्रॅक्टर,ट्रक,बस,पिकअप आणि अवजड वाहने यांना पूर्णपणे प्रवेश बंद करण्यात आला आहे.सदर मोठी वाहने,ट्रॅक्टर,ट्रक,बस,पिकअप आणि अवजड वाहने डोंगराचे पायथ्याला खाली पार्किंग करून पायी जाण्याचा मार्ग वापरावा.डोंगराचे पायथ्याशी बॅरिगेट बसविण्यात आलेल आहे आणि बोर्ड लावण्यात आलेले आहेत.
कुणीही मोठी वाहने डोंगरावर मंदिरापर्यंत घेऊन जाण्याचा अट्टाहास करू नये.नियमांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन श्री क्षेत्र कुंडेश्वर देवस्थान ट्रस्ट पंचक्रोशी यांनी केले आहे.