खेड तालुक्यातील आदर्श गाव खरपुडी बुद्रुक या ठिकाणी ह भ प आदिनाथ महाराज जुन्नरकर(जुन्नर)

Spread the love

प्रतिनिधी.लहु लांडे
खेड
यांचे सुश्राव्य असे किर्तन संपन्न झाले. त्यांनी नामस्मरण हीच खरी भक्ती आणि हरिपाठ या विषयावरती दुसरा वे असे चिंतन मांडले अपूर्ण राहिलेल्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी भगवंताने अवतार घेतला आहे हरिपाठात चिंतन करावे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा देवाचे वर्णन हरिपाठ केलेले आहे संतांची वाणी प्रासादिक वाणी आहे तसेच जोपर्यंत भांडणे आहेत तोपर्यंत वकिलाची गरज आहे आणि जोपर्यंत आजार आहे तोपर्यंत डॉक्टरांची गरज आहे संसार हा दुःखीमय आहे पण भक्ती सागारात गेल्यावरती तो सुखमय होतो असे स्पष्ट मत त्यांनी मांडले आहे . संत कशासाठी कृतीतला अवतरले आहे भूतकाळ सुधारण्यासाठी तीर्थयात्रा करावी. लेक वाचवा लेक शिकवा. नामस्मरण हीच खरी भक्ती आहे नामस्मरणच तुम्हाला संकटापासून दूर करू शकते असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे. त्यांना गायक, पखवाद वाजक,पेटीवाद आणि टाळकरी यांची मोलाची साथ बालदार चोपदार चोपदार यांनी शांततेची जबाबदारी पार पाडली. दुपारी चार ते पाच हभप मुरलीधर महाराज शिंदे खरपुडी बुद्रुक यांचे प्रवचन झाले. कीर्तनाचे सौजन्य पंडित भागुजी गायकवाड उद्योजक मुंबई यांनी दिले.किर्तन रुपी सेवा संपल्यानंतर खरपुडी आणि पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कीर्तन रुपी सोहळ्यामध्ये जिल्हा परिषद माजी सदस्य बाबाराजे राक्षे यांनी सदिच्छा आणि शुभेच्छा दिल्या. यावेळी मा.सभापती दशरथ गाडे, खरपुडी नगरीचे आदर्श सरपंच, चेअरमन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि प्रसिद्ध गाडा मालक जयसिंगशेठ भोगाडे, मा.चेअरमन संजय गायकवाड, तानाजी बरबटे, बाळासाहेब काशिद, ,सामाजिक कार्यकर्ते ऋषी भाऊ काशिद, प्राध्यापक बापूसाहेब चौधरी पाटील, मा. मुख्याध्यापक शामराव चौधरी,खरपुडी गावातील विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी भाविक भक्त आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. किर्तन रुपी सोहळ्याचे सूत्रसंचालन आदर्श उद्योजक , प्रसिद्ध निवेदन चैतन्य गायकवाड यांनी केले. या सप्ताहाचे आयोजन आणि नियोजन ह भ प दत्ता महाराज हळदे,पांडुरंग फंड मंडळ खरपुडी गावातील सर्व भाविक भक्त अगदी व्यवस्थित करत आहे म्हणून त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. धर्मनाथ भजनी मंडळ मांजरेवाडी व भैरवनाथ भजनी मंडळ चांडोली यांचा जागर झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents