
खेड/राजगुरुनगर
प्रतिनिधी. लहु लांडे
वीज कायदा 2003 च्या कलम ५५ नुसार स्मार्ट वीज मीटर लावणे बंधनकारक नाही.
अॅड दिपक रामदास थिगळे
राजगुरूनगर शहरात स्मार्ट मीटर बसवण्याचे जे काम चालु केले आहे ते ताबडतोब बंद करण्यात यावे तसेंच सतत जाणाऱ्या लाईंट मुळे नागरिकांना व व्यापारी वर्गाला होणारा त्रास यासंदर्भात मा.मुख्य कार्यकारी अभियंता साहेब यांची आज प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले तसेंच लाईंटच्या समस्या बाबत साहेबाशी चर्चा केली.हे स्मार्ट मीटर लावणे सर्वानी ताबडतोब बंद करावे. कारण या मीटरच्या वेगवान फिरत्याने वीज बील भरता भरता आपल्याला अतोनात त्रास होणार आहे एकदा का जर हे मीटर आपण लावले तर त्याला पुन्हा कोणीही परत काढू शकणार नाही यांची सर्व राजगुरूनगर वासीयांनी जाणीव ठेवावी.खबरदार राहा
भविष्यातील लूटमार थांबावण्यासाठी नागरिकांनी यांचा तीव्र विरोध करावा हे मीटर बसवणे अनिवार्य नाही. म्हणून हे मीटर आपल्या घरी बसवून घेऊ नका व खबरदार राहा असे आवाहन अॅड दिपक रामदास थिगळे यांनी केले आहे.
यावेळी स्वप्नील माठे, सोपान डुंबरे पाटील, पिंटूशेठ घोरपडे, मोसीन आतार, नजीब आतार इत्यादी नागरिक उपस्थित होते.