
प्रतिनिधी .लहु लांडे
खेड/शिरोली
खेड तालुक्यातील शिरोली येथे शिरोली शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श विद्यालय या माध्यमिक विद्यालयात भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी ध्वजारोहण शिरोली शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक खजिनदार मा. चेअरमन तुकाराम गणपत सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी माजी सरपंच व ज्येष्ठ संचालक चंद्रकांतभाऊ सावंत, हरिभाऊशेठ वाडेकर, मा. उपसरपंच गोरक्षनाथ सांडभोर, कुलस्वामिनी पतसंस्था संस्थापक देवरामशेठ वाडेकर, पतसंस्थेचे अध्यक्ष अतुलशेठ राक्षे, विद्यालयाचे संचालक बाळकृष्ण पवळे, गुलाबशेठ शिवेकर, हनुमंत सावंत, पालकसंघाचे अध्यक्ष महेंद्रशेठ शिनकर, ह.भ.प. संतोष महाराज टाकळकर तसेच ग्रामस्थ व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नेटके आयोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद यांनी केले.