
रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमंत महाराजा फत्तेसिंहराव गायकवाड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, दावडी या प्रशालेत अध्यापनामध्ये इंटर ऍक्टिव्ह पॅनल चा वापर करण्यात येणार आहे .संस्थेच्या ध्येयधोरणानुसार वेगवेगळ्या शाखांमध्ये इंटर ऍक्टिव्ह पॅनेल बसवण्यात आले आहे व त्याद्वारे शिक्षक व विद्यार्थ्यांना डिजिटल अध्यापन व अध्ययनाचे स्रोत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पारंपरिक अध्यापनाबरोबरच तंत्रज्ञानाचा अध्यापनामध्ये वापर करण्यात येणार आहे अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य सौ. रत्नप्रभा शितोळे यांनी दिली. इंटर ऍक्टिव्ह पॅनल अध्यापन कार्यक्रमाचे उद्घाटन दावडी गावचे नवनियुक्त सरपंच श्री अनिल नेटके यांच्या हस्ते करण्यात आले .कार्यक्रमाच्या निमित्त दावडी गावच्या उपसरपंच सौ. धनश्री कान्हुरकर ,पश्चिम विभाग सल्लागार समिती सदस्य श्री. सुरेश डुंबरे, स्कूल कमिटी ज्येष्ठ सदस्य श्री तुकाराम गाडगे, स्कूल कमिटी सदस्य व माजी उपसभापती सौ. वैशाली गव्हाणे, विद्यालयाच्या प्राचार्य सौ. रत्नप्रभा शितोळे,विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.तुकाराम गायकवाड, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यालयामध्ये जून 2025 पासून कृत्रिम बुद्धिमत्ता हा अभ्यासक्रम देखील सुरू करण्यात आला आहे दरम्यानच्या काळात कार्यक्रमाच्या निमित्त उपस्थित दावडी गावचे सरपंच श्री.अनिल नेटके व उपसरपंच सौ. धनश्रीताई कान्हुरकर यांची सरपंच व उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विलास बरबटे यांनी केले