

प्रतिनिधी
खरपुडी बुद्रुक/खेड
खेड तालुक्यातील आदर्श गाव खरपुडी बुद्रुक येथे श्री भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव व श्री संत ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोतर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यामध्ये आज रविवार दिनांक 10 /8/ 2025 रोजी सायंकाळी सात ते नऊ या वेळेत ह भ प पोपट महाराज राक्षे (राजगुरुनगर) यांचे सुश्राव्य कीर्तन सेवा संपन्न झाली. आपल्या वाणी मधून ज्ञान,भक्ती, कर्म यावर अनेक वेगवेगळी दृष्टांत दिले .भावाभावातील नाते कसे असावे .आपली संस्कृती काय आहे. स्त्रियांच्या जीवनामध्ये सौभाग्याचे लेणं कुंकू, बांगड्या, डोक्यावरील पदर का घ्यावा या संदर्भामध्ये अनेक पुराणातले दाखले देऊन महत्व विशारद केले आहे. किर्तन हे प्रबोधनाचे साधन असून हे धांगडधिंग्याचे किंवा विनोदाचे साधन नाही. असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे. महाराजांना टाळकरी, विणेकरी ,पखवाज वादक , भालदार चोपदार यांनी तोला मोलाची सात दिली आहे.
कीर्तनाचे सौजन्य खरपुडी बुद्रुक गावचे आदर्श सरपंच, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, प्रसिद्ध गाडामालक, मा. चेअरमन जयसिंग शेठ भोगाडे, साहेबराव भोगाडे मा. चेअरमन ,मंगेश भोगाडे युवा कार्यकर्ते ,नामदेव भोगाडे राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष यांनी दिले आहे. या सप्ताह सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी दीप्तीताई प्रसाद भोगाडे यांनी सदिच्छा आणि शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी येणारी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले आहे. यावेळी मा. सभापती दशरथ गाडे, मा चेअरमन संजय गायकवाड, आदर्श सरपंच अशोक ओव्हाळ, खरपुडी गावचे युवा कार्यकर्ते ऋषीभाऊ काशिद आणि खरपुडी गावातील विविध वस्त्यांमध्ये ग्रामस्थ ,महिला ,तरुण वर्ग आणि भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. किर्तन रुपी सेवा संपल्यानंतर सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श उद्योजक आणि प्रसिद्ध निवेदक चैतन्य गायकवाड यांनी केले. 38 व्यावर्षातील अखंड हरिनाम सप्ताहाचे नियोजन आयोजन पांडुरंग फंड मंडळ ,सर्व गावातील ग्रामस्थ, भाविक भक्त खरपुडी बुद्रुक हे करत आहे. त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे