
प्रतिनिधी चाकण
खेड /पूर पूर येथे स्वयंचलित हवामान केंद्र (पर्जन्यमापक) उभारण्याबाबत ग्रामपंचायत कार्यालय परिसरात जागेची पाहणी करण्यात आली केंद्र शासनाच्या कृषी विभागाअंतर्गत या कामाच्या अनुषंगाने पाहणी दौऱ्यात पूर ग्रामपंचायत उपसरपंच किशोर सावंत, ग्रामपंचायत अधिकारी भारती मेत्रे, सहाय्यक कृषी अधिकारी मंगेश किर्वे, ग्रामपंचायत कर्मचारी ओंकार सावंत, शेतकरी बाळासाहेब भगत आदी उपस्थित होते. या स्वयंचलित हवामान केंद्रामुळे शेतकऱ्यांना पर्जन्यमान, तापमान, आद्रता आणि वाऱ्याचा वेग, कृषिविषयक सल्ला व मार्गदर्शन प्राप्त व्हावे. कृषी हवामान क्षेत्रात संशोधनासाठी तसेच नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने हवामान विषयक आवश्यक ती माहिती प्राप्त व्हावी इत्यादी बाबींच्या अनुषंगाने केंद्र सरकारच्या WINDS (Weather Information Network Datta System) प्रकल्प अंतर्गत या केंद्राच्या स्थापनेमुळे शेतकऱ्याचे उत्पादन वाढीस मदत होऊन हवामानाशी संबंधित धोके ओळखून पूर्वतयारी करता येणार आहे.