

भामा आसखेड धरणातील पाणीसाठा पिण्याकरिता आरक्षित झाल्याने शेती सिंचनाकरिता पाणी उपलब्ध होऊ शकणार नाही यामुळे उजवा व डावा कालवा रद्द करण्याची मागणी तत्कालीन आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील यांनी शासनाकडे 2019 पासून पाठपुरावा सुरू केला. या कालव्यामुळे खेड, शिरूर ,दौंड तालुक्यामधील हजारो शेतकरी बाधित होत होते. त्या अनुषंगाने तत्कालीन आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील यांच्या पाठपुराव्याची व आझाद मैदानावर शेतकऱ्यांच्या उपोषणाची दखल घेऊन शासनाने 28/ 8 /2023 रोजी कालवा रद्द करण्याचा शासनाने निर्णय घेतला.
सदरच्या शासन निर्णयामध्ये संपादित जमिनी संदर्भात काही त्रुटी राहिल्यामुळे जमीन संपादित झालेले शेतकरी त्या निर्णयापासून वंचित राहिले.
तदनंतर मे 2025 रोजी कार्यकारी संचालक महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे यांनी तहसीलदार खेड यांना इतर हक्कातील कालव्याची शेरे कबजेदार सदरी घेण्याचे पत्र दिले. या पत्रामुळे सर्व शेतकरी बांधवांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले यानंतर शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने दिलीप अण्णा मोहिते पाटील यांच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार यांना निवेदन दिले यावेळी दादांनी संबंधित विभागाला पत्र देऊन बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले
तदनंतर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष श्री कैलास दादा वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व शेतकरी बांधवा समवेत महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या निवासस्थानी भेट घेतली यावेळी बाधित शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली यावेळी विखे पाटील साहेबांनी सदरच्या विषयाबाबतीत माहिती घेऊन अधिकाऱ्यांबरोबर बैठक आयोजित केली जाईल असे आश्वासन दिले
यानंतर तात्काळ संबंधित विषयावर सह्याद्री अतिथी ग्रहावर संबंधित खात्यातील अधिकारी सचिव ,प्रधान सचिव, कार्यकारी अभियंता, चीफ इंजिनियर ,तसेच खेड तालुक्याचे विद्यमान आमदार बाबाजी शेठ काळे, श्री कालिदास दादा वाडेकर मुबीनभाई काझी सचिन पानसरे ,दत्ताशेठ चौधरी हर्षद गोरे, कालिदास गोरे ,सचिन पानसरे उपस्थित होते सदरच्या बैठकीमध्ये मंत्री महोदयांनी खंत व्यक्त केली की कालवा रद्द झालेला असताना अद्याप शेतकऱ्यांचे जमिनीवरचे शेरे वगळले का नाही? यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे शेरे वगळण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याची सूचना जलसंपदा विभागातील अधिकारी व महसूल अधिकारी यांना दिले यानंतर तात्काळ अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली या बैठकीला विद्यमान आमदार बाबाजी शेठ काळे कालिदास दादा वाडेकर व अन्य शेतकरी उपस्थित होते सदरच्या बैठकीमध्ये संपादित जमिनी संदर्भात तीन वेगवेगळे प्रस्ताव तयार करण्याचे व कायद्याचे चौकटीत संपादित क्षेत्र कसे वगळले जातील असे मुबीनभाई काझी यांनी उपस्थित करून अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले यावेळी अप्पर जिल्हाधिकारी श्री मापारी साहेब यांनी पुढील प्रक्रिया तातडीने राबवून दोन महिन्यात संबंधित विषयावर निष्कर्ष काढला जाईल असे आश्वासन दिले