आळंदी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीस प्रभाग रचना जाहीर

Spread the love
सूचना हरकतीस मुख्याधिकारी खांडेकर यांचे नागरिकांना आवाहन
आळंदी ( लहु लांडे) : येथील आळंदी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ साठी तयार करण्यात आलेली प्रारूप प्रभाग रचना शासनाचे मार्गदर्शक सूचना प्रमाणे नागरिकांना सूचना हरकती साठी जाहीर करण्यात आला असल्याची माहिती मुल्ह्याधिकारी माधव खांडेकर यांनी दिली.
  आळंदी नगरपरिषदेने राज्य शासनाचे मार्गदर्शक सूचना प्रमाणे प्रारूप प्रभाग रचना तयार करून नगरविकास विभागाचे माध्यमातून निवडणूक आयोगाकडे पाठविली होती. निवडणूक आयोगाचे सुचणे प्रमाणे प्रारूप प्रभाग रचना नगरपरिषद मुख्याधिकारी श्री खांडेकर यांनी नागरिकांना पाहण्यास नकाशे आणि प्रभाग रचना नगरपरिषद कार्यालयात ठेवली असून नागरिकांनी यावर सूचना हरकती देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासनाच्या आदेशा नुसार स्थापन करण्यात आलेल्या प्रभाग रचना समिती मार्फत प्रस्ताव तयार करून पुढे पाठविण्यात आला होता.
  राज्य निवडणूक आयोगाच्या सुचणे प्रमाणे पुणे विभागीय आयुक्तांना प्रारूप प्रभाग रचनेला मान्यता देण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला होता. आयुक्तांनी यास मान्यता देत नागरिकांना आता सदरची प्रारूप प्रभाग रचना पाहण्यास खुली केली आहे. यावर नागरिकांनी प्रारूप प्रभाग रचना १८ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत नागरिकांना सूचना हरकती साठी देण्यात आला आहे. यावर विहित मुदतीत नागरिकांनी आपल्या सूचना , हरकती दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रभाग रचना १८ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर प्रभाग रचना नगरपरिषदेच्या सूचना फलकावर आणि अधिकृत वेबसाईटवर नागरिकांना पाहता येईल. आळंदी नगरपरिषद क्षेत्रात एक ते नऊ असे नऊ प्रभाग प्रत्येकी दोन सदस्यीय तर दहावा प्रभाग तीन सदस्यीय राहतील. असे २१ सदस्य निवडणुकीने निवडले जाणार आहेत.
   नागरिकांनी प्रारूप प्रभाग रचने बाबत आपल्या हरकती व सूचना लेखी स्वरूपात नगरपरिषद कार्यालयातील आवक – जावक विभागात देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्राप्त हरकती व सूचनांवर संबंधितांना स्वतंत्र पणे सुनावणीची संधी दिली जाणार आहे. मुदतीत आलेल्या हरकती सूचना यांचाच विचार केला जाणार असल्याचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents