

जुन्नर तालुक्यातील दिव्यांग, बेघर लोकांना जागा व घरकुल, शेतकरी लोकांच्या पिकाला हमी भाव आदिवासी भिल्ल, कातकरी समाजातील लोकांना शासनाच्या योजना मिळाव्यात म्हणून श्री गौरवभाऊ जाधव राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर तालुक्यातील प्रहार रूग्ण सेवक व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केन्द्र महाराष्ट्र राज्य ग्रूप च्या वतीने
प्रहार जनशक्ती पक्ष महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष व मा राज्य मंत्री नामदार श्री बच्चूभाऊ कडू यांची मंत्रालय येथे भेट घेऊन श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोउत्शोव निमीत्ताने किल्ले शिवनेरी येथे व श्री गिरीजात्मज लेण्याद्री गणपती जुन्नर तालुका येथे भेट दयावी म्हणून चर्चा व इतर अनेक विषयांवर चे निवेदन देवून विषयांवर चर्चा 1) जुन्नर शहरातील 1400च्या वर, व जुन्नर तालुक्यातील ग्रामीण भागातील बेघर लोकांना जागा व घरकुल मिळावे ,2) दिव्यांग लोकांना मोफत साहित्य वाटप करण्यात येणार आहे तसेच 3) जुन्नर नगर पालिका ,शाळा, काॅलेज, ग्रामपंचायत, शासकीय, निमशासकीय कार्यालय मध्ये ठेका पध्दतीने साफसफाई कामे कामगारांकडून कमी पगारात 3/4हजार रूपये मध्ये 12/12तास कामावर राबवून घेत आहे व सुट्टी कीवा इतर आरोग्य सुविधा, पी,ऐफ,नाही 15/ते 20 वर्षे काम करूनही अद्याप कायम करत नाही अश्या सफाई कामगारांना न्याय देवून कायम नोकरीत सेवेत समाविष्ट करावे व पगार वाढ करावी 4) दिव्यांग, विधवा परित्यक्ता अनाथ निराधार सोडचिठ्ठी झालेले त्रीतीयपंथ लोकांना संजय गांधी पेन्शन मिळणारी 1000/रूपये यात वाढ करून 5000/रूपये दर महिन्याला मिळावी 5)दिव्यांग ,विधवा यांच्या मुलांनचे वय 21च्या पुढे झाल्यावर संजय गांधी पेन्शन ही शासनाकडून बंद करण्यात येते ती मुलांची 21वयाच्या अटी शासनाने रद्द करावी व पुन्हा या लोकांना संजय गांधी पेन्शन योजना सुरू करावी 6) शेतकरी च्या पिकाला हमी भाव मिळावा 7)भिल्ल आदिवासी, कातकरी समाजातील लोकांना गायरान जागा व पडीक जागेवर घरकुल देण्यात यावे व राशन कार्ड, आधार कार्ड, जातीचे दाखले व शासनाच्या विविध योजना मिळाव्यात अश्या इतर अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली या वेळी जुन्नर तालुक्यातील 40दिव्यांग लोकांना तीन चाकी सायकल चे मोफत वाटप करण्यात आले होते डिसेंट फाउंडेशन जुन्नर तालुका चे सामाजिक काम या बद्दल श्री जितेंद्र भाऊ बिडवई यांचे व टीम चे नामदार श्री बच्चूभाऊ कडू मा. राज्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी स्वागत सत्कार,अभिनंदन केले. या वेळी प्रहार रूग्ण सेवक व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केन्द्र महाराष्ट्र राज्य ग्रूप चे संस्थापक अध्यक्ष श्री दिपक चव्हाण ,श्री अरूण शेरकर अध्यक्ष ,डिसेंट फाउंडेशन जुन्नर तालुका व लेण्याद्री गणपती देवस्थान चे अध्यक्ष श्री जितेंद्र भाऊ बिडवई , श्री संजय ढेकणे, श्री शंकर ताम्हाणे, श्री भगवान हांडे , शेख अहमद इनामदार, सौरभ मातेले, श्री हरी नायकोडी श्री केरभाऊ नायकोडी शबरी माता भिल्ल आदिवासी समाज जुन्नर तालुका अध्यक्ष श्री सागर पवार, श्री बालाजी मेटेवाड (नांदेड ) ,श्री नितीन माळी ( नाशिक ) अमित वायकर व कार्यकर्ते उपस्थित होते या वेळी श्री बच्चूभाऊ कडू यांनी लवकरच जुन्नर भेट देण्यासाठी येणार आहे असे अश्वासन दिले आहे
प्रतिनिधी कार्यकारी संपादक लहु लांडे