
चाकणच्या श्री. एस. पी. आघाव पाटील शिक्षण संस्थेला राष्ट्रीय उत्कृष्ट शैक्षणिक पुरस्कार जाहीर
वार्ताहर: चाकण
दि. 14 फेब्रुवारी
चाकण येथील श्री. एस. पी. आघाव पाटील शिक्षण संस्था यांच्या अंतर्गत विश्वशांतीनिकेतन विद्यालय, संतोष ऑल राऊंडर अकॅडमी आणि सारा अबॅकस अकॅडमी सन 4 जून 2012 सालापासून चाकण पंचक्रोशीमध्ये शैक्षणिक काम करत आहे. आरोग्य – संस्कार – शिक्षण, ज्ञानम – परम – ध्येयम ज्ञानम परम, विद्यार्थी – शिक्षक – पालक हे त्रिसूत्रीच्या आधारे यशस्वी शैक्षणिक कार्य करत आहेत. विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता सुधारणे, तथा आत्मविश्वास वाढवणे, स्मरणशक्ती वाढवणे, एकाग्रता वाढवणे, त्याला बौद्धिक दृष्ट्या सक्षम आणि सशक्त बनवणे हे शैक्षणिक कार्य संस्थेच्या अंतर्गत विविध कोर्सेस आणि क्लासेसच्या माध्यमातून सुरू आहे. आजपर्यंत राज्यस्तरीय, राष्ट्रीय विविध प्रकारचे पुरस्कार या शिक्षण संस्थेला मिळालेले आहेत. डॉ. प्रविण आघाव हे उच्च शिक्षित आहेत. आघाव हे संस्थेचे संस्थापक डायरेक्टर आणि सचिव म्हणून काम पाहतात. संस्थेच्या शैक्षणिक कार्याची दखल घेत लाईफस्टाईल ग्लोबल वेल्फेअर फाउंडेशन, पुणे यांच्याकडून तिसऱ्या एज्युकेशनल इनोव्हेटिव्ह समिटमध्ये
राष्ट्रीय शैक्षणिक उत्कृष्टता पुरस्कार 2023 / नॅशनल एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड शैक्षणिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल शैक्षणिक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
पुणे येथील कार्यक्रमांमध्ये
डायरेक्टर नॉलेज अँड स्किल इन्स्टिट्यूट इंडियाचे चेअरमन डॉ. संजय गांधी सीईओ, कॉसमॉस ग्लोबल नेटवर्क सिंगापूरच्या पूजा शुक्ला, डॉ. सत्यप्रकाश तिवारी, सदस्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, वाराणसी यांच्या हस्ते लाईव्ह स्टार लाईफस्टार ग्लोबल वेल्फेअर फाउंडेशनचे अध्यक्ष नारायण कुमार फड यांच्या उपस्थितीत श्री एस पी आघाव पाटील शिक्षण संस्थेचे संस्थापक, सेक्रेटरी, फाउंडर डॉ. प्रविण आघाव यांना शैक्षणिक उत्कृष्ट उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरस्कार देण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी जगभरातील शिक्षणावर केले जाणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमावर चर्चा झाली. आघाव यांना मिळालेला शैक्षणिक पुरस्कार हा शैक्षणिक कार्याचा उत्कृष्ट कार्याची पोहोच पावती आहे. चाकण पंचक्रोशीमधून त्यांचं कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. या पुरस्काराच्या पाठीमागे सर्वात महत्त्वाचे योगदान संस्थेचे शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांचे आहे. अशी प्रतिपादन आघाव यांनी केले. अशी माहिती प्राचार्या अर्चना प्रविण आघाव यांनी सांगितली.