हरवला आहे…आढळून आल्यास चाकण पोलीस स्टेशनची तत्काळ संपर्क साधा

Spread the love
हरवलेला लहान मुलगा
संशोध व्यक्ती या व्यक्तींनी नेला आहे दिसल्यास कॉल करा

फिर्यादी जवाब दि. २३/०२/२०२३. मी अश्विनी उमेश सुर्यवंशी, वय ३० वर्षे व्यवसाय-गृहिणी, रा. पप्पु माडगे यांचे भाडयाचे रूममध्ये, आगरवाडी रोड, शिक्षक कॉलनीच्या जवळ, चाकण खेड, जि. पुणे मो.नं. ता. ८६६९०७७११४ / ८६२४८३३२१७.

समक्ष चाकण पोलीस स्टेशन येथे हजर राहुन जबाब देते की, मी वरील ठिकाणी माझे पती उमेश, मुलगी पलख वय ७ वर्षे, मोठा मुलगा पारख वय ६ वर्षे (जन्मतारीख – १२/०९/२०१७), लहान मुलगा सुरज वय २ वर्षे असे एकत्रित राहण्यास असुन माझे पती रिक्षाचालक असुन त्यांचे कमाई मधुन मिळणारे उत्पन्ना मधुन आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. माझे पती हे सकाळी ०९/०० वा. रिक्षा घेवुन जात असतात.

दि. २२/०२/२०२३ रोजी नेहमी प्रमाणे माझे पती हे सकाळी ०९/०० वा. रिक्षा घेवुन कामासाठी गेले होते. माझे दोन महिन्यांपूर्वी कुटुंबनियोजनाचे ऑपरेशन झाले असुन माझे ओटीपोटामध्ये दुख लागल्याने मी सकाळी ०९/३० वा. चे सुमारास माझा लहान मुलगा सुरज याला घेवुन भोसरी येथे सरकारी रूग्णालयात गेले होते. माझा मोठा मुलगा पारख आणि मुलगी पलख हे दोघेही घरी एकटेच होते. मी सायंकाळी ०७/०० वा. चे सुमारास घरी माघारी आली असता माझा मुलगा पारख उमेश सुर्यवंशी, वय ६ वर्षेहा घराबाहेर मोकळया मैदानात खेळण्यासाठी गेला असे माझी मुलगी पलख वय ७ वर्षे हिने सांगितले. मी तो दररोज खेळ तो त्यामोकळया जागेत आगरवाडी रोड येथे शोध घेतला परंतु माझा मुलगा पारख हा – मिळुन आला नाही. म्हणुन मी आजुबाजुच्या परिसरात शोध घेतला परंतु तो कोठेही मिळुन आला नाही. म्हणुन माझी खात्री झाली की माझा अल्पवयीन मुलगा पारख उमेश सूर्यवंशी, वय ६ वर्षे यांस कोणीतरी अज्ञात इसमाने कशाचे तरी आमिष दाखवुन त्याचे अज्ञानपणाचा फायदा घेवुन माझे कायदेशीर रखवालीत असणारा माझा मुलगा पारख अपहरण करून पळवून नेला आहे. माझे अपहृत मुलाचे वर्णन खालीलप्रमाणे-

नाव- पारख उमेश सुर्यवंशी, वय ६ वर्षे (जन्मतारीख – १२/०९/२०१७), अंगाने – मध्यम, रंग सावळा, उंची- ४ फुट, चेहरा- गोल, नाक थोडे बसके, केस- झिरो कट केलेला, नेसणीस-निळया रंगाचा चौकडा शर्ट व निळया रंगाची जिन्स पॅन्ट, कमरे भोवती काळयारंगाचे दो-याचाकरजोडा येणे प्रमाणे वरील वर्णनाचा माझा अल्पवयीन मुलगा नामे पारख उमेश सुर्यवंशी, वय ६ वर्षे हा

द. २२/०२/२०२३ रोजी ०९/३० वा. तेसायंकाळी ०७/०० वा. च्या दरम्यान आगरवाडी रोड समोरिल कळया जागेत खेळत असताना राहते घरासमोर कोणीतर अज्ञात इसमाने कशाचे तरी आमिष दाखवुन नावे अज्ञानपणाचा फायदा घेवुन माझे कायदेशीर रखवालीत असणारा माझा मुलगा अपहरण करून पळवुन ला आहे. म्हणुन माझी अज्ञात इसमा विरूध्द कायदेशीर तकार आहे. वरील संगणकावर टाईप केलेला जबाब प्रिंट काढलेनंतर मी वाचून दाखविला असता तो माझे गणेप्रमाणे बरोबर आहे.

समक्ष

प्रियांका साळुखे )

पिलीस उपनिरीक्षक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents