संत निरंकारी मिशनद्वारा अमृत परियोजने अंतर्गत ‘स्वच्छ जल – स्वच्छ मन’ अभियानाचा भव्य शुभारंभ भीमा नदी घाट वाकी खुर्द येथे निरंकारी स्वयंसेवकांनी केले स्वच्छ

Spread the love
संत निरंकारी मिशनद्वारा अमृत परियोजने अंतर्गत ‘स्वच्छ जल – स्वच्छ मन’ अभियानाचा भव्य शुभारंभ
भीमा नदी घाट वाकी खुर्द येथे निरंकारी स्वयंसेवकांनी केले स्वच्छ
चाकण, २६ फेब्रुवारी, २०२३ :-
संत निरंकारी मिशन मार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सदगुरु माता सुदिक्षाजी महाराज व निरंकारी राजपिताजी यांच्या कृपाशीर्वादाने रविवार, दिनांक २६ फेब्रुवारी, २०२३ रोजी ‘अमृत परियोजने’ अंतर्गत 'स्वच्छ जल - स्वच्छ मन’ अभियान सकाळी ७ ते १२ या वेळेत संपन्न झाले. या अभियानामध्ये भीमा नदी घाट क्षेत्रातील पाण्यात पडलेला प्लास्टिक कचरा, सेंद्रिय कचरा ,अपशिष्ट (निरुपयोगी) पदार्थ, अनावश्यक झुडपे, खराब अन्नपदार्थ, जलपर्णी तसेच जलाशयांमध्ये आढळून येणारे शेवाळ जाळीयुक्त काठ्यांचा वापर करुन स्वच्छ करण्यात आले तसेच नदीकाठचा परिसर स्वच्छ करण्यात आला. संत निरंकारी मिशनचे पुणे झोन प्रभारी श्री.ताराचंद करमचंदांनी यांनी या परियोजनेविषयी विस्तृत माहिती देताना सांगितले, की ही परियोजना संपूर्ण भारतदेशात २७ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील ७३० शहरांमध्ये जवळपास ११०० हुन अधिक ठिकाणी राबविण्यात आली.‘अमृत परियोजने’ अंतर्गत पुणे जिल्ह्यातील मुळा, मुठा, इंद्रायणी, नीरा, भीमा, कऱ्हा, घोडनदी, पवना, कुकडी, मीना,वेळू अशा सर्व नद्यांवरील विविध घाट त्याचबरोबर खडकवासला धरण, नाझरे धरण, कात्रज तलाव, पाषाण तलाव अशा ४१ ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला. त्यामध्ये स्थानिक निरंकारी सेवादल तसेच अन्य निरंकारी भक्तगण ५००० हून अधिक संख्येने सहभागी झाले होते. ‘जल संरक्षण’ आणि ‘जल बचाव’ करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचे नियोजन करुन ते कार्यान्वित करणे हा या परियोजनेचा मुख्य उद्देश होता. बाबा हरदेवसिंहजी महाराज यांनी आपल्या कार्यकालात समाज कल्याणाचे अनेक उपक्रम राबवले, त्यामध्ये स्वच्छता व वृक्षारोपण अभियान यांची सुरुवात प्रमुख आहेत. त्यांच्याच शिकवणूकीतून प्रेरणा घेत दरवर्षी निरंकारी सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या निर्देशनानुसार विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असून यावर्षी अमृत परियोजनेचे आयोजन करण्यात आले आहे . या परियोजनेअंतर्गत आज २६ फेब्रुवारी २०२३ रोजी, एकाच दिवशी संपूर्ण भारतभर निरंकारी मिशनच्या सुमारे १ .५ लाखहुन अधिक स्वयंसेवकानी समुद्रकिनारे, नद्या, सरोवरे, तलाव, विहीर, झरे, पाण्याच्या टाक्या, नाले आणि जलप्रवाह इत्यादिंची स्वच्छता केली तसेच जल संरक्षणाची प्रेरणा दिली
ही परियोजना पर्यावरण संतुलन, प्राकृतिक सौंदर्य आणि स्वच्छतेसाठी केला जाणारा एक प्रशंसनीय व स्तुत्य प्रयत्न आहे अनुताई कले ,सरपंच वाकी मयूर परदेसी दीपक तळपे तसेच नगरपरिषद चे विजय भोंडवे साहेब ,हे उपस्थीत होते शेवटी चाकण ब्रांच चे प्रमुख मधुकर गोसावी जी यांनी सर्वांचे आभार मानले ,सचिन वाघमारे यांनी माहिती दिली

प्रतिनिधी संपादक लहु लांडे बातमीसाठी मोबाईल नंबर 9766694886 हा नंबर वर आपली बातमी पाठवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents