डेहणे महाविद्यालयात मराठी राजभाषा दिन साजराहुतात्मा राजगुरू शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय डेहणे. ता – खेड येथे कवी कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी “नक्षत्राच देण काव्य मंचाचे” राष्ट्रीय अध्यक्ष प्रा राजेंद्र सोनवणे यांनी ग्रंथाच महत्व पटवून देताना मराठी भाषेविषयी चा अभिमान आपल्या कृतीतूनही दिसला पाहिजे तरच मराठी समृद्ध होईल असे प्रतिपादण करताना न्यायाललीन प्रक्रियेत ही मराठी भाषाचा वापर झाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. तर प्राचार्य दिलीप गोरे यांनी आपल्या कवितेतून मराठी काव्य प्रकार माणसाला अडचणीच्या कळत आधार देतो व कवितेच्या आधारे माणूस जीवन जगत् असतो. कविता मराठी भाषेला अधिक देखन करते असे विचार मांडले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जयराम खाडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून मराठी भाषेचा प्राचीन वारसा आणी आधुनिक काळातील आव्हाने या विषयावर विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी मराठी विभागातील प्रा संतोष शिंदे यांनी प्रस्ताविक केले तर पाहुण्यांचा परिचय प्रा भरत शेंगाळ यांनी करून दिला. या वेळी उपप्राचार्य प्रा सिलदार पावरा, कनिष्ट विभाग प्रमुख प्रा निखिल सरजिने, सर्व प्रध्यापक व विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा महेश रानवडे यांनी तर आभार प्रा नितीन काळे यांनी मानले.
प्रतिनिधी संपादक लहु लांडे बातमीसाठी मोबाईल नंबर 9766694886 हा नंबर वर आपली बातमी पाठवू शकता