

शिक्रापूर ता. शिरूर : शिक्रापूर येथे पाबळ चौक पुणे नगर महामार्ग मद्धधुंद कारचालकाने एका कारला व दोन दुचाकीनां धडक देऊन तीन वाहनांचे नुकसान केले . या अपघात मध्ये दोन जण जखमी झाले आहे. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे संभाजी गायकवाड या कार चालकावर गुन्हा दाखल झाला आहे.
शिक्रापूर येथील नगर महामार्गावर अनिल औटी हे त्यांची कार घेऊन पुणे बाजुकडे चालले होते. नगर बाजूने मद्धधुंद व्यवस्थेत आलेल्या कारचालकाने औटी यांच्या कारला धडक दिली, त्याचबरोबर पुढे चालेल दोन दुचाकींना धडक देऊन गेला त्यावेळी दुचाकी वरील महेंद्रसिंग राजपूत व जयश्री दौंडकर हे दोघे जखमी झाले.अपघाताची माहिती मिळताच हवालदार सहदेव ठुबे, गणेश शेंडे, मिलिंद देवरे, ज्ञानदेव गोरे, अमोल राऊत अनिल वाडेकर यांनी कार चालकाला चाकण चौक येथे अडवुन ताब्यात घेतले, तो मद्धधुंद अवस्थेत कार चालवीत असल्याच दिसुन आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले..
याबाबत अनिल भाऊसाहेब औटी रा. चऱ्होली ता. हवेली यांनी फिर्याद दिली आहे.
कु.सचिन दगडे
शिरूर तालुका प्रतिनिधी
8767358432/ 7350559916