सहा वर्षाचे चिमुकल्याचे अपहरण करणा-या आरोपीस चाकण पोलीसांकडुन गजाआड, अपहरण केलेल्या बालकाची सुखरूप सुटका.

Spread the love
दिनांक २३/०२/२०२३ रोजी चाकण पोलीस स्टेशन येथे अश्विनी उमेश सुर्यवंशी, वय ३० वर्षे, व्यवसाय गृहिनी, रा. आगरवाडी रोड, चाकण ता. खेड जि. पुणे यांनी चाकण पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली की, त्यांचा मुलगा नामे पारख उमेश सूर्यवंशी, वय ६ वर्षे, रा. आगकरवाडी रोड चाकण ता. खेड जि. पुणे यास दिनांक २२/०२/२०२३ रोजी सकाळी ०९/०० ते सायंकाळी ०७/०० वा. चे दरम्यान आगरकरवाडी रोडवरून मोकळया जागेत खेळत असतांना कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांचे कायदेशिर रखवालीतुन अपहरण करून पळवून नेलेले आहे. वगैरे मजकुराची तक्रार दिले वरून चाकण पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टी नं २४२ / २०२३ भादवि कलम ३६३ प्रमाणे दाखल करण्यात आलेले आहे.
सदर गुन्हयाचे गांभिर्य लक्षात घेवुन पोलीस उप आयुक्त, परिमंडळ- १ श्री. विवेक पाटील, सहा. पोलीस आयुक्त, प्रेरणा कट्टे तसेच चाकण पोलीस स्टेशनचे वपोनि श्री वैभव शिंगारे यांनी चाकण पोलीस स्टेशन कडील तपास पथकास सदर अपहरीत मुलाचा व आरोपीचा शोध घेणे बाबत सुचना व मार्गदर्शन केले. त्यांनतर चाकण पोलीस स्टेशन कडील तपास पथकाने गुन्हयाचे घटनास्थळ परीसरातील तसेच घटस्थळावर येणारे जाणा-या रस्त्यावरील त्याच प्रमाणे चाकण परीसरातील सुमारे १०० पेक्षा जास्त ठिकाणावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यावेळी लक्षात आले की, सदर गुन्हयातील अपहृत बालकास सु-या नावाचा फिरस्ता इसम सोबत घेवुन जात आहे. परंतु सदर गुन्हयातील आरोपी सु-या याचे पुर्ण नाव तसेच पत्ता व ठाव ठिकाणा याबाबत काहीच उपयुक्त माहिती मिळुन येत नव्हती. चाकण पोलीसांनी सदर अपहरीत मुलाचा व आरोपीचा फोटो प्रसार माध्यमांमध्ये, सोशल मिडीयावर प्रसिध्दी पत्रक तसेच पुणे, ठाणे, रायगड, अहमदनगर जिल्हयातील रेल्वे स्टेशन, बस स्थानकांमध्ये भिंतीपत्रके चिटकवून आरोपी व अपहृरीत बालकाची माहिती मिळाल्यास पोलीसांना माहिती देण्याबाबत प्रसिध्दी दिली होती. तसेच सदर आरोपी व अपहरीत मुला बाबत गोपनीय बातमीदार यांना माहिती दिलेली होती. तसेच चाकण पोलीस स्टेशन कडील तपास पथकाने आरोपी बाबत लोणावळा येथे जावुन आरोपी व अपहृत बालकाचा शोध घेतला. तपास पथक सदर गुन्हयातील आरोपी व अपहरीत मुलाचा कसोशीने शोध घेत असतांना दिनांक १०/०३ /२०२३ रोजी बेहरगाव ता. मावळ जि. पुणे येथील पोलीस पाटील अनिल पडवळ यांनी सपोनि प्रसन्न ज-हाड व सफौ सुरेश हिंगे यांना माहिती दिली की, नमुद गुन्हयातील अपहरीत मुलगा व एक फिरस्ता इसम कार्ला येथे दिसत आहे, सदर माहितीचे अनुषंगाने चाकण पोलीसांनी कार्ला ता. मावळ जि. पुणे येथुन अपहृरीत मुलगा पारख उमेश सुर्यवंशी, वय ६ वर्षे यास आरोपी सुरेश उर्फ सु-या लक्ष्मण वाघमारे वय ४५ वर्षे, रा. पठारवाडी चाकण ता खेड जि पुणे मुळ रा. देवघर वाकसाई ता. मावळ जि. पुणे यांचेकडुन ताब्यात घेतले आहे. सदर आरोपीस गुन्हयात अटक करण्यात आलेली असुन अपहारीत मुलगा पारख यास सुखरुन त्याचे पालकांचे ताब्यात देण्यात आलेले आहे. सदर गुन्हयातील आरोपी बाबत कोणतीही उपयुक्त माहिती नसतांना चाकण पोलीस स्टेशन कडील तपास पथकाने जुन्या पारंपारीक पध्दतीचा व बातमीदारांकडुन मिळालेल्या माहिती उपयोग करून आरोपीस ताब्यात घेवुन अपह्ररीत मुलाची त्याचे ताब्यातुन सुखरूप सुटका केलेली आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, श्री. विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त, श्री. संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ- १ श्री. विवेक पाटील, सहा. पोलीस आयुक्त, प्रेरणा कट्टे यांचे सुचना व मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. वैभव शिंगारे तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल देवडे, तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रसंन्न जराड, विक्रम गायकवाड, सुरेश हिंगे, पो हवा राजु जाधव, संदिप सोनवणे, पोना हनुमंत कांबळे, निखिल शेटे, भैरोबा यादव, पोका / नितीन गुंजाळ, निखील वर्षे, अशोक दिवटे, प्रदिप राळे, सुनिल भागवत, चेतन गायकर यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि प्रसन्न ज-हाड हे करीत आहेत

प्रतिनिधी संपादक लहु लांडेअस्सल न्यूज महाराष्ट्र 8007686970 बातमीसाठी नंबर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents