
पुणे चाकण.
दहावीच्या परीक्षेत चाकण मधील चक्रेश्वर मंदिरा जवळील इनोव्हेटिव्ह इंटरनॅशनल स्कूलचा 2022 23 च्या इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. अशी माहिती प्राचार्य अर्चना मंगळूर यांनी दिली पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील चाकण येथील नावाजलेल्या इनोव्हेटिव्ह इंटरनॅशनल स्कूल मध्ये यावर्षी इयत्ता दहावीच्या परीक्षेला एकूण 53 विद्यार्थी बसले होते सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक आनंद राजभर 96 % , द्वितीय क्रमांक वेदांत पाटील 93 % , तृतीय क्रमांक सोहम भोर 91%, चतुर्थ क्रमांक सुरज महातो व आदित्य गुप्ता 85%, पाचवा क्रमांक मशिरा काझी यांनी पटकावले.
संस्थेचे अध्यक्ष श्री निवृत्ती पिंगळे व संस्था सदस्य श्री जी ए जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रम प्रसंगी श्री ठोंबरे सर यांनी विद्यार्थ्यांना दहावीनंतर शिक्षणातील विविध संधी यावर मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी,पालक तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला संस्था अध्यक्ष श्री निवृत्ती पिंगळे, सचिव सौ शितल संदेश टिळेकर व मुख्याध्यापिका अर्चना मंगळूर यांनी मुलांना पेढे भरवून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमास संस्था सचिव सौ शितल संदेश टिळेकर, ,संस्थेच्या बीएड कॉलेजचे प्राचार्य ज्ञानेश्वर दुधवडे, मुख्याध्यापिका सौ अर्चना मंगळूर व उपमुख्याध्यापिका डिसोजा मॅडम , विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठे सर यांनी केले तर आभार अनिता कुशवाह यांनी मानले.
अस्सल न्यूज महाराष्ट्र संपादक लहू लांडे