चाकण येथे आज TDM चित्रपटाच्या प्रमोशन साठी ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली .

Spread the love

चाकण येथे आज TDM चित्रपटाच्या प्रमोशन साठी ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली . रॅलीचे आयोजन वडवानल कल्चरल सेंटर चाकण, चाकण मधील सर्व कलाकार बंधू व ट्रॅक्टर मालक यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले .TDM चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक भाऊराव कराडे आणि प्रमुख कलाकार पृथ्वीराज थोरात आणि कालिंदी निस्ताने हेही या रॅलीसाठी उपस्थित होते .
हा चित्रपट 9 जून ला थिएटर्सला प्रदर्शित झाला असून या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चाकण मध्ये जोरदार ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले.
या रॅलीमध्ये चाकणमधील अनेक कलाप्रेमी लोकांनी सहभाग घेतला .
रॅलीमध्ये चित्रपटाचे कलाकार पृथ्वीराज आणि कालिंदी यांनी स्वतः ट्रॅक्टर ड्राईव्ह केला
जोरदार घोषणा सहीत सिनेमा पहावा ,सिनेमा लोकांनी थिएटरमध्ये जाऊन पहावा यासाठी घोषणा दिल्या गेल्या
चाकण मार्केट यार्ड पासून सुरू झालेली ही रॅली महात्मा फुले चौक, नगरपरिषद
पासून पुढे जात एसटी स्टँड येथे
समारोप करण्यात आले .

चाकणकर यांनी रॅलीच्या वाटेवरती कलाकारांचे स्वागत केले आणि अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये रॅली पार पाडली रॅलीसाठी चाकण पोलीस स्टेशन यांचे सहकार्य झाले .

समारोप प्रसंगी भाऊराव कराडे यांनी मत मांडताना म्हटले की मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळाली पाहिजे तसेच लोकांनी मराठी चित्रपट थेटर मध्ये जाऊन पाहिले पाहिजे एस्टॅब्लिश मराठी किंवा इतर कलाकारांचे ऐवजी ग्रामीण कलाकारांना व नवीन कलाकारांना संधी देणाऱ्या निर्माते दिग्दर्शकांचे सिनेमे लोकांनी आवर्जून पाहिले पाहिजे
तसेच भविष्यामध्ये चाकण मधील कलाकारांसोबत एक सिनेमा नक्की करणार असाही शब्द भाऊराव कराडे यांनी दिला ।

अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात रॅली पार पडली . सर्व कलाकारांचे व टीम वडवनाल मुळे हे शक्य झाले

अस्सल न्यूज महाराष्ट्र संपादक लहू लांडे जाहिरातीसाठी कॉन्टॅक्ट नंबर 9370612656

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents