

दिनांक २९/०६/ २०२३ रोजी वार गुरुवार आषाढी एकादशीच्या दिवशी कडुस (प्रती पंढरपुर) ता.खेड जि.पुणे येथे झालेल्या गो मातेच्या हत्येच्या निषेधार्थ या निंदनीय कृत्या बाबल खेड तालुका बंद पाळणे बाबत. महोदय, उपरोक्त विषयावरून आपणास विनंती की, खेड तालुक्यामध्ये दिनांक ०३/०७/२०२३ रोजी झालेल्या चर्चेत सर्वानुमते गो मातेच्या हत्तेच्या निषेधार्थ खेड तालुका पुर्णपणे बंद करणेबाबत निर्णय घेण्यात आला. त्याच प्रमाणे दिनांक ०३/०७/२०२३ रोजी वार सोमवार रोजी पुर्ण दिवस बंद पाळण्याचे सर्वानुमते ठरले आहे. हिंदु धर्मात आषाढी एकादशीचे विशेष महत्त्व असून हा दिवस अतिशय पवित्र आहे. अश्या या दिवशी काही समाजकंटकांकडुन हिंदु धर्मातील पवित्र असणाऱ्या अनेक गोमातांची हेतुपूर्वक कतल केली असून हिंदू धर्मियांच्या धार्मिक श्रद्धांचा दुष्ट उद्देशाने केलेले हनन असल्याचे स्पष्ट होत आहे. सदर व्यक्तीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असुन वारंवार धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी पोषक कृत्ये यांच्या मार्फत करण्यात आहे. तरी संबंधित व्यक्ती असे गुन्हे वारंवार करणाऱ्या या गुन्हेगारांना मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी आपणास विनंती तथा मागणी. अन्यथा समस्त हिंदु समाजाच्या वतीने खेड तालुक्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल याची प्रशासनाने दखल घ्यावी. त्यावेळी पुणे जिल्हा उपाध्यक्ष RPl (A) खेड तालुका युवक अध्यक्ष आकाश भाऊ शांताराम डोळस व आमचे सहकार्य सैा .सिद्धिका आकाश डोळस खेड तालुका युवक उपाध्यक्ष निलेश शेठ भोसले सर्वांच्या सहकार्याने खेड पोलिस स्टेशनला निवेदन देण्यात आले
अस्सल न्यूज महाराष्ट्र संपादक लहू लांडे 9766694886 आपल्या भागातल्या छोट्या मोठ्या बातम्यांसाठी संपर्क करा