

आज सोमवार दिनांक ३१/०७/२०२३, रोजी कुरूळी केंद्राची शिक्षण परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाकण नंबर दोन येथे दुपारी १ ते ५ या कालावधीत संपन्न झाली. केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय श्री. हिरामण कुसाळकर सर यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली उत्कृष्टरित्या पार पडली.
प्रथम केंद्रप्रमुख व सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांनी सरस्वती पूजन केले. सुंदर अससे ईशस्तवन आणि स्वागतगीत जि. प. प्राथमिक शाळा चाकण नंबर एकच्या बालचमुनी आपल्या मधुर गायनाने आणि संगीत साथीने साकारले 🌷💐🌷💐 केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.हिरामण कुसाळकर यांचा सन्मान सर्वप्रथम उत्कृष्ट नियोजनाबद्दल करण्यात आला. कुरुळी केंद्रात शिष्यवृत्तीची परंपरा अविरत चालू ठेवल्याबद्दल शिष्यवृत्ती मार्गदर्शक सुवर्णा चव्हाण मॅडम तुकाराम भास्कर सर तृतीय क्षीरसागर मॅडम संदीप नाणेकर सर अनिता सांगळे मॅडम,सोनाली जाधव मॅडम, वैशाली तलोळे मॅडम यांचा सन्मान करण्यात आला. पहिल्याच केंद्र परिषदेची अतिशय कमी वेळामध्ये उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल चाकण नंबर एक शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता तीतर मॅडम, सकाळी नंबर दोन शाळेच्या मुख्याध्यापिका इंदुमती पवार मॅडम, चाकण उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका यास्मिन इझरोद्दीन मॅडम, यांना सन्मानित करण्यात आले. उर्वशी शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम आंबवने सर, कुरुळी शाळेचे मुख्याध्यापिका सुनिता नाईक मॅडम, दिघोजी शाळेचे मुख्याध्यापक संदीप काळे सर, चिंबळी शाळेचे मुख्याध्यापिका संगीता उगले मॅडम, नानेकर वाडी शाळेचे मुख्याध्यापक संदीप नाणेकर सर, मुटकेवाडी शाळेचे मुख्याध्यापिका आशा तांबे मॅडम, राणूबाईमळा शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश लांडे सर,सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांना सन्मानित करण्यात आले.
तदनंतर चाकण नंबर एक शाळेच्या गुणवंत शिक्षिका सविता उगले मॅडम यांनी परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स व पाठ्यपुस्तकाचा वापर याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
तदनंतर चाकण नंबर एक शाळेच्या गुणवंत शिक्षिका संगीता उगले मॅडम मॅडम यांनी गुणवत्ता वृद्धी कार्यक्रम, निपुण शाळा निकष, याविषयी सविस्तर सखोल मार्गदर्शन केले. तदनंतर चाकण नंबर एक शाळेच्या गुणवंत पदवीधर शिक्षिका मनीषा कुंभार मॅडम यांनी नवभारत साक्षरता अभियान, तंबाखू मुक्ती अभियान याविषयी कृतीयुक्त मार्गदर्शन केले. व शेवटी चाकण नंबर एक शाळेचे गुणवंत पदवीधर शिक्षक सुरज बारसकर सर यांनी व्हिडिओ निर्मिती याविषयी अतिशय सुंदर मार्गदर्शन केले.
*आभार प्रदर्शन*
कार्यक्रमाचे उत्कृष्ट आणि भारदस्त सूत्रसंचालन श्री. देवराव मुंडे सर व श्री. संतोष दौंडकर सर यांनी केले. फलक लेखन अक्षरमित्र डावरे सर यांनी केले. कलात्मक रांगोळी चाकण नंबर एकच्या महिला भगिनींनी प्रवेशद्वारापाशी साकारली. शेवटी चाकण नंबर एक शाळेच्या ज्येष्ठ पदवीधर शिक्षिका अलका कड/ठाकूर यांनी सर्वांचे आभार मानले व शिक्षण परिषदेची सांगता झाल
(पदवीधर शिक्षक, जि.प. प्रा. शाळा राणूबाईमळा- चाकण)🎯✒️*