
पिपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ १ मधील पोलीस स्टेशनच्या हद्दीत खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी, खंडणी असे गुन्हे करणा-या टोळी प्रमुखांसह त्यांच्या साथीदारांवर अनेकदा अटकेची कारवाई केली जाते तरीही त्याच्या गुन्हेगारी कारवाया सुरूच राहत असल्याने या टोळ्यांतील गुन्हेगारांवर हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे.
परिमंडळ १ हद्दीतील भोसरी एमआयडीसी भोसरी, चिंचवड, निगडी, पिंपरी, दिघी, आळंदी, चाकण, एमआयडीसी महाळुंगे या पोलीस स्टेशनकडून प्राप्त झालेल्या तडीपार प्रस्तावाची चौकशी केल्यानंतर जानेवारी २०२३ ते आज पावेतो एकूण ५३ सराईत गुन्हेगारांवर पिंपरी चिंचवड, पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद व पुणे ग्रामीण हद्दीतून (पुणे जिल्हा) दोन वर्षे तडीपार आदेश मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ १. श्री. विवेक पाटील, पिंपरी चिंचवड यांनी मा. पोलीस – आयुक्त श्री. विनय कुमार चौबे, यांचे मार्गदर्शनाखाली काढलेले आहेत.
दिनांक १६/०८/२०२३ व दिनांक १८/०८/२०२३ रोजी ०२ दिवसातच भोसरी पोलीस स्टेशन अंतर्गत टोळीतील खालील १३ सराईत गुन्हेगार टोळी क्रमांक १)- १) मुसा उर्फ मुसीफ वजिर थोरपे, वय २१ वर्षे, रा. नूर मोहलना गल्ली, दिघी रोड, भोसरी, पुणे (टोळी प्रमुख) २) किरण उर्फ किक्या सुरेश डोळस, वय २४ वर्षे, रा. क्रांती सूर्यानगर, दिघी रोड, भोसरी, पुणे (टोळी सदस्य) ३) रुषीकेश उर्फ बंटी संतोष इंगळे, वय २३ वर्षे, रा. गवांडे यांचे खोलीत राधेकृष्ण कॉलनी नं.. ३. चक्रपाणी वसाहत, भोसरी, पुणे (टोळी सदस्य).
तसेच टोळी क्रमांक २) १) सागर दिपक वाल्मिकी, वय २० वर्ष, रा. सिध्दार्थ नगर, दापोडी, पुणे १२ (टोळी प्रमुख) २) सैफ अली अहमद रेन वय २२ वर्षे, रा. एस. एम. एस. कॉलनी वॉर्ड नंबर ४ दापोडी, पुणे (टोळी सदस्य) ३) ओमकार निळकंठ गायकवाड, वय २३ वर्षे, रा. सिध्दार्थनगर, दापोडी, पुणे (टोळी सदस्य) ४) चार्लस उर्फ बॉबी शेखर पिल्ले, वय २० वर्षे, रा. नालंदा बुध्दविहार समोर पवार बस्ती, दापोडी, पुणे (टोळी सदस्य) ५) ऋतीक कोंडिबा जावीर, वय २२ वर्षे रा. पवार वस्ती, दापोडी, पुणे (टोळी सदस्य) ६) प्रणव उर्फ सोन्या विनोद कांबळे, वय २० वर्षे, रा. पवार वस्ती, दापोडी, पुणे (टोळी सदस्य) ७) संकेत उर्फ महादया गणेश पवार, वय २० वर्षे, रा. शिवशक्ती तरुण मंडळ जवळ, वॉर्ड नं. ३, दापोडी, पुणे, (टोळी सदस्य) ८) राहुल उर्फ चिक्या शाम साळवे, वय २२ वर्षे, रा. सुदाम काटे चाळ, नेहरू चौक, दापोडी, पुणे (टोळी सदस्य ९) अक्षय उर्फ जंगल्या राजू भालेराव, वय २६ वर्ष, रा. महादेव आळी, दापोडी गावठाण, पुणे. (टोळी सदस्य) १०) राम अशोक कांबळे, वय २१ वर्षे, रा. प्रकाश बाडेकर यांच्या घरासमोर सिध्दार्थ नगर, दापोडी, पुणे टोळी सदस्य) यांना पिंपरी चिंचवड, पुणे शहर पोलीस आयुक्तालय व पुणे ग्रामीण हद्दीतून दोन वर्षे तडीपार केलेले आहे..
सदरची उल्लेखनिय कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे, मा. पोलीस सह आयुक्त डॉ. संजय शिंदे, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. वसंत परदेशी यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ-०१) श्री. विवेक पाटील, मा. सहायक पोलीस आयुक्त, पिपरी विभाग, श्री. सतिश कसबे, श्री भास्कर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भोसरी पोलीस स्टेशन, सपोनि कल्याण घाडगे, पोउपनि अशोक दांगट, पोलीस अंमलदार राजेंद्र राठोड, बसंत दळवी, वैभव येरंडे, नुतन कोडे, सुकन्या घोलप यानी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
(विवेक पाटील)
पोलीस उप आयुक्त, परिमंडळ- १ पिंपरी चिंचवड आयुक्तालय