

आज हुतात्मा राजगुरू यांच्या पवित्र वाड्यावर श्री शिवाजी विद्या मंदिर चाकण चे इयत्ता १० वी च्या विद्यार्थी त्यांच्या पवित्र स्मृतिस अभिवादन करण्यासाठी गेले.आपण विविध ठिकाणी भेटी देत असतो पण अशा पवित्र ठिकाणी भेट देऊन त्यांना अभिवादन करण्याची भावना वेगळीच असते. याप्रसंगी स्मारक समितीचे सदस्य श्री प्रवीण गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना संपूर्ण वाडा दाखवून त्यासंबंधी माहिती दिली.यावेळी चाकण कॉलेजच्या प्राध्यापिका सौ. अफ्रोज इनामदार व पालक वर्ग ही उपस्थित होता.या क्षेत्रभेटीचे नियोजन श्री राजेंद्र खरमाटे यांनी केले.