


नवसह्याद्री चॅरिटेबल ट्रस्टचे इनोव्हेटिव्ह इंटरनॅशनल स्कूल चाकण या विद्यालयाने आज चाकण पोलीस स्टेशन येथे पोलीस बांधवांना राखी बांधून, सामाजिक बांधिलकीचा एक वेगळाच आदर्श घालून दिला.या रक्षाबंधन कार्यक्रमाला चाकण पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. राठोड साहेब ,पी.एस .आय श्री अमोल ढेरे साहेब, पी.एस.आय . श्री सागर बामणे साहेब, पोलीस हवालदार श्री.जाधव साहेब, दामिनी पथकाच्या सौ.खंडागळे मॅडम, सौ.हडवळे मॅडम ,पोलीस शिपाई चव्हाण व पोलीस नाईक घनवट मॅडम हे सर्व उपस्थित होते. कार्यक्रमाच्या वेळी एपीआय साहेब व पीएसआय साहेब यांनी विद्यार्थ्यांच्या मनातील शंकांचे निरसन करून त्यांना मार्गदर्शन केले. आपण एक सुजाण नागरिक आहोत याची जाणीव करून पोलीसांबद्दल मनात असलेली भीती दूर केली आणि कार्यक्रमाच्या शेवटी तुमचे सदैव रक्षण करतील ही विद्यार्थिनींना रक्षा बंधनाची ओवाळणी दिली. हा कार्यक्रम विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ अर्चना मंगलोर मॅडम, उपमुख्याध्यापिका डिसुझा मॅडम व सर्व शिक्षकवृंद यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता. विद्यालयाचे प्रा मराठे सर , सौ सुरेखा उंडे मॅडम , सौ विनया नलावडे मॅडम हे सर्व उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.लहू जाधव सर व विद्यालयाची विद्यार्थिनी कू.शांतीप्रिया सिंग यांनी केले. कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एन.डी.पिंगळे सर व संस्थेच्या सेक्रेटरी सौ.शीतल टिळेकर मॅडम यांनी शुभेच्छा दिल्या.