


समस्त कनेरसर पंचक्रोशीतील ग्रामस्थ, आणि अंबिका विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने चांद्रयान ३ मोहिमेत मोलाचं योगदान देणारे कनेरसर गाव चे सुपुत्र रमेश मारूती दौंडकर यांचा आज दिनांक १/९/२०२३ रोजी ढोल ताशांच्या गजरामध्ये,फेटा बांधून,औक्षण करून विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी भव्य सत्कार केला.अध्यक्ष स्थानी कनेरसरच्या सरपंच सुनिता केदारी होत्या.रमेश दौंडकर यांनी आपल्या भाषणात देशाचे सर न्यायाधीश धनंजय चंद्रचूड, कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे,थोर साहित्यिक नामदेव ढसाळ हे कनेरसर गावचे भूषण असल्याचे सांगितले.चांद्रयान ३ मध्ये आलेल्या अडचणी व त्यावर केलेली मात या विषयी माहिती दिली.शेवटी आपले ध्येय साध्य करण्यासाठी परिश्रम,चीकाटी व सतत कार्यमग्नतेची गरज विद्यार्थी यांना पटवून दिली.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गंगासागर फड तर सर्वांचे आभार मुख्याध्यापक अशोक नगरकर व अजय पोंदे यांनी मानले..