
1) राजगुरुनगर येथील स्वराज्य शिक्षण संस्था.संचलीत सहयोग विशेष मुलांची शाळा येथील सर्व विशेष मुलांना स्वेटर आणि फ्रिज देण्यात आला.

2) चाकण येथील नवयुग अंगनवाडीसाठी एक बेबी वजनकाटा देण्यात आला.
3) चाकण आगरकरवाडीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सर्व विद्यार्थ्यांना ट्रॅकसुट वाटप करण्यात आले.

कंपनीचे मालक श्री.तुषार मेहता आणि श्री.शुभम मेहता यांचे हस्ते सर्व वाटप करण्यात आले.
श्री.अंकुश आगरकर यांनी सर्व शाळेत जाऊन त्यांना आवश्यक असणारे साहित्याची मागणी कंपनीकडे करून साहित्य मिळवुन देण्यासाठी विशेष भुमिका पार पाडली.
यावेळेस कंपनीचे मालक श्री.तुषार मेहतासाहेब यांनी यापुढील काळात आपल्याकडून असेच सहकार्य मिळेल, त्याचबरोबर आपण समाजाचे काहीतरी देणे लागत आहोत आणि गरीब घरातील मुलांनाही शिक्षण मिळण्यासाठी कंपनी सहकार्य करेल अशी भावना व्यक्त केली.
मान्यवर पाहुण्यांचे सर्व शाळेत स्वागत करून आभार मानले.

यावेळी अध्यक्ष संदीप जाधव, मुख्याध्यापक छत्रीकर सर,संस्थापिका सौ. पुष्पाजंली मराठे,अंगणवाडी शिक्षिका सौ. प्रियंका आगरकर ,खेड पंचायत समितीतीच्या विषेश तज्ञ सौ.भागें मॅडम आणि सौ. सांडभोर मॅडम ऊपस्तीत होते.