
खेड ,आंबेगाव, जुन्नर आणि मावळ तालुक्यातील आदिवासी विभागातील योजनांना गती मिळावी आणि ज्यांच्याकडे पुरावे नाहीत अशा अनुसूचित जमाती मधील महादेव कोळी, ठाकर आणि कातकरी समाजातील नागरिकांना घोडेगाव आदिवासी प्रकल्पाच्या शिफारशीवरून जातीचे दाखले मिळावे यासंबंधी आज सविस्तर चर्चा झाली.
मंत्री महोदयांनी घोडेगाव आदिवासी प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांना तातडीने फोन करून अशा प्रकारे प्रस्ताव आलेल्या सर्व प्रस्तावांची पाहणी करून शिफारस करण्याच्या सूचना केल्या.
पुढील महिन्याभराच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर या पद्धतीने नुसार जातीचे दाखले देण्याचे नियोजन केले आहे.
तसेच पक्षाच्या माध्यमातून या क्षेत्राचा मंत्री महोदय दौरा/प्रवास देखील करणार असून यातून रखडलेली विविध विकासकामे मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे.
तसेच राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची देखील मी आणि माननीय आशाताई बुचके यांनी आज भेट घेतली लवकरच उत्तर पुणे जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते आणि महसूल विभागाचे सर्व अधिकारी अशी एक समन्वय बैठक आपण आयोजित करणार आहोत. आपल्या कार्यकर्त्यांची सर्व लहानसं कामे स्थानिक पातळी झाली पाहिजे हा त्या पाठीमागचा उद्देश आहे.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना याबाबत आम्ही विनंती केली होती. प्रदेश सरचिटणीस श्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी याकामी सहकार्य केले.
