


प्रतिनिधी संपादक. लहू लांडेसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व हुतात्मा राजगुरू शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कळमोडी येथे दि 8 जानेवारी 2024 रोजी विशेष श्रमसंस्कार शिबिराच उदघाटन पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक श्री अरुणशेठ चांभारे यांच्या शुभ हस्ते पार पडलं. या वेळी त्यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अशा प्रकारच्या शिबिरातून विध्यार्थ्यांनी नैतिक मूल्यांची जोपासना केली पाहिजे. तरच विध्यार्थ्यांच्या जीवनाला आकार येईल आणी ते काम अशी शिबीर करत असतात असे प्रतिपादन केले. कळमोडी गावच्या प्रथम नागरिक सौ सुनीता ताई नामदेव गोपाळे यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विध्यार्थ्यांनी विविध कलागुन विकसित केले पाहिजे हे कलागून विकसित करण्याची ही नामी संधी आहे असा विश्वास व्यक्त केला. त्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होत्या. या वेळी चिखलगावचे माजी सरपंच श्री बाळासाहेब गोपाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पश्चिम विभागाचे प्रमुख नामदेव गोपाळे यांनी ही शिबिरास शुभेच्छा दिल्यात. यावेळी डेहने गावचे सरपंच मीना ताई लांघी माजी सरपंच दत्ताशेठ खाडे, कळमोडी गावचे पोलीस पाटील अंकुश गोपाळे, उपसरपंच नंदू अभंग रत्नाई महाविद्यालय कनिष्ट विभाग प्रमुख प्रा निर्मला अडवळे तसेच गावातील विविध पदाधिकारी, ग्रामस्थ, महाविद्यालयातील सर्व प्रध्यापक, विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच प्रस्ताविक महाविद्यालयाचे प्रचार्य डॉ जयराम खाडे यांनी तर आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा सिलदार पावरा यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा भास्कर जगदाळे यांनी केले.