
संपादक प्रतिनिधी लहुजी लांडे
दिनांक १८/०३/२०२४ रोजी रासे फाटा येथे मराठा हॉटेल मध्ये फिर्यादी स्वप्निल शिंदे याचेवर गोळीबार झाला होता. सदर बाबत चाकण पोलीस ठाणे गु. र. नं १९२/२०२४ भा. द. वी कलम ३०७, आर्म अॅक्ट ३ (२५) नुसार संवेदनशील व गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल होता. चाकण पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील सपोनि प्रसंन्न ज-हाड व पथकाने मोबाईल तांत्रिक विश्लेषण करुन सदर गुन्हयासबंधी अमर नामदेव शिंदे, वय २५ वर्षे, रा. कासार आंबोली ता. मुळशी जि. पुणे यास दिनांक २३/०३/२०२४ रोजी ताब्यात घेवुन त्यास गुन्हयाचे अनुषंगाने चाकण पोलीस स्टेशन कडील तपास पथकाने विचारपुस केली.चाकण पोलीस ठाणेकडील तपास पथकातील अधिकारी व अमंलदार यांनी आरोपी नामे अमर शिंदे याचेकडे INTERROGATION SKILL चा वापर करन अधिक चौकशी केली असता त्याने धक्कादायक माहीती दिली की, रेकॉर्ड वरील आरोपी नामे राहुल सजंय पवार याचा भाऊ रितेश सजंय पवार याचा तीन महीन्यापुर्वी खुनाच्या छिन्न विछिन्न झालेल्या चेह-याचा फोटो आदित्य युवराज भांगरे, वय १८ वर्षे, रा. भांगरे वस्ती, म्हाळुंगे ता. खेड जि. पुणे याने इंन्स्टाग्राम वर वारंवार स्टेटसला ठेवल्याच्या रागातुन राहुल पवार याने कट करुन अमर शिंदे तसेच त्याचे इतर दोन सहकारी यांनी मिळुन दिनांक १६/०३/२०२४ रोजी दुपारी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे हददीतुन अदित्य युवराज भांगरे याचे चारचाकी वाहनातुन अपहरण केले त्यास वाहनामध्ये बेदम मारहाण करुन त्याचा वायरचे सहायाने वाहनामध्येच गळा आवळुन खुन केला असल्याची कबुली दिली. त्याअनुषंगाने अधिक माहिती घेता अदित्य भांगरे हा बेपत्ता असल्याबाबत म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुरनं १६४/२०२४ भा. द. वि कलम ३६४ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे समजले. आरोपी नामे अमर नामदेव शिंदे, वय २५ वर्षे, रा. कासार आंबोली ता. मुळशी जि. पुणे यास पुढील कायदेशीर कारवाईसाठी म्हाळुंगे पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेले होते.म्हाळुंगे पोलीसांनी आरोपीस अटक करुन गुन्हयाचा सखोल तपास केला असता आरोपी यांनी दिशाभुल करण्यासाठी मयताचा मोबाईल गोवा राज्य येथे सहभागी आरोपी सोबत पाठविला व अदित्य भांगरे यास निमगाव शिवारातील डोंगरामध्ये लाकडाचे सहायाने जाळल्याची माहिती दिली. सदर ठिकाणी मृतदेह जाळल्याच्या खुना दिसुन आल्या नाहीत, अधिक चौकशी करता आरोपीने कबुली दिली की, गुन्हयातील मयत अदित्य भांगरे याचे प्रेत महाराष्ट्र-गुजरात सिमेवर जंगलाध्ये जाळल्याचे सांगीतले. त्याप्रमाणे तपास पथक पाठवुन आरोपीने दाखविलेल्या ठिकाणावरुन प्रेताचे अर्धवट जळालेले अवशेष पुढील कारवाईसाठी ताब्यात घेतले आहे. गुन्हयातील मुख्य आरोपी राहुल पवार व इतर साथीदारांचा शोध घेणेकरीता पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेकडील पथके प्रयत्न करीत आहेत.सदरची कारवाई मा. श्री. विनय कुमार चौबे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, श्री. वसंत परदेशी अति. पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, डॉ. शिवाजी पवार पोलीस उप आयुक्त परिमंडळ ३ व श्री. राजेंद्रसिंह गौर, सहायक पोलीस आयुक्त, चाकण विभाग चाकण यांचे सुचना व मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद वाघ, श्री. नितीन गिते वरीष्ठ पोलीस निरीक्षक म्हाळुंगे पोलीस ठाणे, डी. बी पथकाचे सपोनि प्रसंन्न ज-हाड, पोसई नामदेव तलवाडे, सफौ सुरेश हिंगे, पो हवा / संदिप सोनवणे, पोहवा राजु जाधव, पो हवा हनुमंत कांबळे, पो हवा / शिवाजी चव्हाण, पोना / निखील शेटे, पोकों/ नितीन गुंजाळ, पोकों / सुनिल भागवत, पोकों / संदिप गंगावणे, पोकों / अशोक दिवटे, पोकों / प्रदिप राळे, पोकों निखील वर्षे, पोकॉ महेश कोळी, मपोकॉ माधुरी कचाटे यांनी केलेली असुन खुनाच्या गुन्हयाचा पुढील तपास श्री. संतोष कसबे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), सपोनि कल्याण घाडगे, पोसई संतोष जायभाय व म्हाळुंगे पोलीस स्टेशन डी. बी पथकाचे पोहवा राजेंद्र कोणकीरी, अमोल बोराटे, तानाज गाडे, विठठल वडेकर, अजय गायकवाड, संतोष वायकर, गणेश गायकवाड, राजेंद्र खेडकर, शरद खैरे यांनी केलेला आहे.(डॉ. शिवाजी पवार)पोलीस उप आयुक्तपरिमंडळ-३, पिंपरी चिंचवड


