


प्रतिनिधी संपादक.लहूजी लांडे
रत्नागिरी जिल्ह्यातील, खेड तालुक्यातील, तिसंगी गावातील, निकमवाडी येथील सुकन्या कुमारी. सेजल स्वाती सुहास यादव ही नुकतेच भारतीय नौदलाचे (INDIAN NAVY) ” ओरिसा ” येथील खडतर प्रशिक्षण पूर्ण करून गुरुवार दिनांक ०४/०४/२०२४ रोजी तिसंगी येथील तिच्या राहत्या घरी ग्रामदेवता केदार काळकाईच्या पालखीचे स्वागत करण्यासाठी आलेली होती.*गुरुवार दिनांक ०४/०४/२०२४ रोजी रात्री १०.०० वाजता आजी माजी सैनिक कल्याण समिती, रत्नागिरी (जिल्हास्तरीय रत्न संघटना) तसेच आजी माजी सैनिक संघ, तिसंगी यांच्यावतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.**मुंबईला अंधेरी येथे राहणारी मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेली कुमारी. सेजल हिला लहानपणा पासूनच देशसेवेची आवड होती. तिचे माध्यमिक शिक्षण चालू असतानाच पुणे येथील गरुड झेप ॲकाडमीच्या माध्यमातून लेखी परीक्षा, मैदानी कवायती (खेळ) तसेच आरोग्य ह्या सर्व परीक्षा पास करून दीड वर्ष परिश्रम घेऊन नंतर भारतीय नौसेना (INDIAN NAVY) च्या खडतर अश्या प्रशिक्षणासाठी ” ओरिसा ” येथे दाखल झाली. जवळ जवळ ” ४ ” महिने ओरिसा येथील प्रशिक्षण पूर्ण करून ग्रामदेवता केदार काळकाईच्या स्वागतासाठी आपल्या तिसंगी गावातील (निकमवाडी) येथे स्वगृही आली होती.**तिच्या ह्या यशाबद्दल तिचे स्वागत तसेच सत्कार करण्यासाठी तिसंगीतील सन्माननीय ज्येष्ठ असे भारतीय सेनादल (INDIAN ARMY), भारतीय नौसेना (INDIAN NAVY) मधील मान्यवर व्यक्तिमत्व उपस्थित होते. तिचा सत्कार आणि ग्रामदेवतेचे आगमन असा हा दुग्धशर्करा योग जुळून आला होता.**कुमारी. सेजल हिच्या सत्कार समारंभासाठी आजी माजी सैनिक कल्याण समिती, रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष श्रीमान. सुधीर पांडुरंगराव भोसले, श्रीमान. अनंतराव आप्पाजीराव भोसले.* *तसेच आजी माजी सैनिक संघ, तिसंगीचे श्रीमान. नरसिंगराव बाबाजीराव भोसले, श्रीमान. मधुसूदन पांडुरंगराव भोसले, श्रीमान. सुरेशराव महादेवराव शिर्के, श्रीमान. लक्ष्मणराव भोसले. श्रीमान. निरंजन (सुभाष) पुतळाजी निकम, श्रीमान. शामसुंदर रघुनाथ कदम. उपस्थित होते.**सत्कारमूर्ती कुमारी. सेजल यादव हिचा सत्कार श्रीमान. नरसिंगराव भोसले आणि श्रीमान. शामसुंदर कदम यांनी केला.**वरील कार्यक्रमाचे सूत्र संचालन (निवेदक) श्रीमान. संजय रामचंद्र निकम यांनी केले.**कुमारी. सेजल यादव हिच्या सत्कार सोहळ्यासाठी तिसंगीतील ग्रामस्थ तसेच महिला मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते.
