
प्रतिनिधी संपादक लहू लांडे
अशोक सहकारी बँक लिमिटेड अहमदनगर ,शाखा चाकण चे शाखाधिकारी श्री मनोज थोरात यांची कन्या कु.आरती नीता मनोज थोरात हिने ICAI तर्फे घेतल्या जाणाऱ्या सनदी लेखापाल (C.A) परीक्षेत उत्तुंग यश मिळविले आहे.कुं.आरती हीचे शालेय शिक्षण श्री शिवाजी विद्यामंदिर, चाकण आणि महाविद्यालयीन शिक्षण हुतात्मा राजगुरू महाविद्यालय,खेड आणि गरवारे कॉलेज,पुणे येथे झालेआहे.कठोर परिश्रम आणि ठाम विश्वास हे तिच्या यशाचे श्रेय आहे.तसेच आई वडील आणि लहान बहिण वैष्णवी यांचा कायम पाठिंबा तिच्या पाठीशी होता.विविध क्षेत्रातून तीचे अभिनंदन होत आहे.
