
खेड तालुक्यातील राजगुरुनगर शहरांमध्ये कारगिल विजय दिवस भारतीय सैन्य दलाच्या अतुलनीय शौर्याला २५ वर्षे पूर्ण झाल्याने रौप्य महोत्सवी सोहळाशुक्रवार, दि. २६ जुलै २०२४ रोजी सकाळी ९वाजता राजगुरूनगर एस टी स्टॅन्ड जवळ शहीद स्मारक येथे कार्यक्रम संपन्न झाला . खेड तालुक्याचे आमदार दिलीपराव मोहिते पाटील, यांच्या हस्ते कारगिल शहीद वीर सैनिकांना श्रदांजली अर्पण करून शहीद मानवंदना पुष्पहार घालून ध्वजारोहण चा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर आमदार साहेबांनी सैनिकांना सदिच्छा आणि शुभेच्छा दिल्या. त्यानंतर राष्ट्रवादी सैनिक सेल यांच्याकडून आमदार साहेबांना हा प्रस्ताव अमित बबनराव मोहिते सैनिक सेल सरचिटणीस ,वैशाली ताई पवळे पुणे जिल्हा महिला अध्यक्ष , बबनराव बोराडे खेड तालुका अध्यक्ष शुभेदार चंद्रशेखर जाधव, दत्तात्रय सुक्रे मनोज धायबर सर्व पदाधिकारी माजी सैनिक आम्हाला एक शहीद राष्ट्रीय स्मारक पाहिजे अशी मागणी करण्यात आली. यावेळी खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते यांनी शब्द दिला नक्की होईल. तसेच सर्व सैनिकांशी त्यांनी संवाद साधला तसेच वीर नारी वीरमाता यांच्या शी संवाद साधला. आमदार साहेबांनी असे आश्वासन दिले कि खेड तालुक्याच्या सैनिकांसाठी जे हुतामा राजगुरू स्मारक बनत आहे आणि सैनिकांसाठी एक वेगळे सैनिक भवन असेल. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अमित मोहिते यांनी केले तर दत्तात्रय सुक्रे यांनी आभार मानले .