
न्यूज अपडेट*कोयता जवळ बाळगणारा अँबुलंस सह ताब्यात*आज दि 28/08/2024 रोजी अंमली पदार्थ विरेाधी पथक, गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड कडील सपोनि विक्रम गायकवाड, श्रेपोउपनि जिलाणी मोमीन, पोहवा/1508 मयुर वाडकर, पोशि/2712 कपिलेश इगवे, पोशि/2381 निखिल वर्पे व चापोशि/2235 पांडुरंग फुंदे असे म्हाळुंगे एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलींग करीत असताना *पोलीस अंमलदार निखील वर्पे* यांना मिळालेल्या माहितीवरुन *इसम नामे परमेश्वर उर्फ गुगल दयानंद खाडे, वय 19 वर्षे, रा कुरुळी फाटा येथे असलेला एच.पी. पेट्रोल पंपाचे समोर, बागडे वस्ती, हनु बागडे यांचे घरामध्ये भाडयाने, कुरळी, पुणे* यास ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातुन *एकुण 3,80,300/- किं.ची माल ज्यामध्ये एक लोखंडी कोयता, 01 पांढरे रंगाची मारुती सुझुकी ओमणी गाडीची अँब्युलन्स हि चारचाकी गाडी व 01 मोबाईल* असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याचेविरुध्द म्हाळुंगे एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन येथे भारतीय शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 4(25) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1) (3) सह 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सविनय सादर*(संतोष पाटील)*वरिष्ठ पोलीस निरीक्षक,अंमली पदार्थ विरोधी पथक,गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड
प्रतिनिधी. लहुजी लांडे