खेड तालुका अध्यक्षपदी

रत्नेश वैरागे
बहुजन रयत परिषदच्या
खेड तालुका अध्यक्षपदी
रत्नेश वैरागे
चाकण : बहुजन रयत परिषद महाराष्ट्र राज्याचा पदाधिकारी नियुक्ती मेळावा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये चाकण येथील सामाजिक कार्यकर्ते रत्नेश वैरागे यांची खेड तालुका अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. यावेळी माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे, प्रदेशाध्यक्ष रमेश गालफाडे, महिला प्रदेश अध्यक्ष कोमल साळुंखे यांच्या हस्ते खेड तालुका अध्यक्षपदी रत्नेश वैरागे यांना निवडीचे पत्र देण्यात आले. चाकण शहरातील गोरगरीब जनतेची शासकीय कामे पूर्ण करण्यासाठी रत्नेश वैरागे नेहमीच अग्रेसर असतात. याच कामाची पोचपावती म्हणून त्यांना बहुजन रयत परिषदेच्या तालुका अध्यक्षपदी काम करण्याची अभिनंदन आली आहे. रत्नेश वैरागे यांच्या निवडीचे चाकण परिसरात सर्व स्तरातून कौतुक होत आहे