

प्रतिनिधी लहू लांडे
रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमंत महाराजा फत्तेसिंहराव गायकवाड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय दावडी या शाळेच्या विद्यार्थ्यांनी वारीचा आनंद लुटला. विद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून महालक्ष्मी मंदिरापर्यंत दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. दिंडीचे उद्घाटन विद्यालयाच्या प्राचार्य सौ रत्नप्रभा शितोळे व आनंदग्राम गुरुकुल आध्यात्मिक शिक्षण संस्थेचे ह.भ. प. श्री दत्तात्रय महाराज शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल व रखुमाई मूर्तीच्या पूजनाने झाले. पारंपारिक वारकरी पोशाख परिधान करत राम कृष्ण हरी ,पांडुरंग पांडुरंग ,विठ्ठल विठ्ठल, ज्ञानेश्वर महाराज की जय अशा हरिनाम घोषात विद्यार्थ्यांची पायी दिंडी विद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून महालक्ष्मी मंदिरापर्यंत काढण्यात आली दिंडीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी विठ्ठल रखुमाई, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर ,श्री राम आदी संत व देवतांची पात्र साकारत वारीचा आनंद द्विगणित केला. महालक्ष्मी मंदिराच्या प्रांगणामध्ये विद्यार्थ्यांनी विठ्ठल नामाच्या गजरामध्ये फुगड्या खेळत आषाढी वारीचा आनंद लुटला. कार्यक्रमाचे नियोजन क्रीडा शिक्षक श्री श्रीकांत घुले व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी केले . कार्यक्रमाच्या निमित्त विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकर्मचारी वृंद बंधू आणि भगिनी , विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी सर्वांचे अभिनंदन केले.