
मा.पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे यांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये अंमली पदार्थांचे अवैध विक्रीवर आळा घालणे करीता व अंमली पदार्थांचे समुळ उच्चाटन करणेबाबत आदेशीत केले आहे.*
*मा पोलीस उप आयुक्त, गुन्हे संदिप डोईफोडे, मा सहा पोलीस आयुक्त, गुन्हे 2, बाळासाहेब कोपनर यांचे मार्गदर्शनाखाली* अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखे कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संतोष पाटील यांनी अंमली पदार्थ विरोधी पथकातील सहा पोलीस निरीक्षक सचिन कदम, विक्रम गायकवाड, पोउपनि ज्ञानेश्वर दळवी व पोलीस अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करुन विधानसभा निवडणुकीचे अनुशंगाने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थांचे अवैध विक्रीवर आळा घालणे करीता व अंमली पदार्थांचे समुळ उच्चाटन करणेबाबत आदेशीत केले. वपोनि संतोष पाटील, सपोनि विक्रम गायकवाड व पथक हे दिघी आळंदी परीसरात रात्री संशयीत वाहन चेकिंग करीत असताना *पोलीस अंमलदार विजय दौंडकर व गणेश कर्पे* यांना आळंदी घाट येथुन एक मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर गाडी दिघीचे दिशेने भरधाव येताना दिसली. त्यांनी ती थांबवुन गाडी चालविणारा इसम नामे नुरमोहम्मद गफ्फार पिंजारी, वय 45 वर्षे, रा वडाला गाव, मदिना नगर, मदिना मस्जिद समोर, ता जि नाशिक याचेकडे चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देवु लागला. त्याचे वागण्याचा संशय आल्याने त्याचेकडील चारचाकी गाडीची तपासणी केली असता गाडीचे डिकीमध्ये एक पांढरे रंगाचे नायलॉनचे पोते मिळुन आले. त्या पोत्यामध्ये एकुण 55 किलो 690 ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ मिळुन आला.
*इसम नामे नुरमोहम्मद गफ्फार पिंजारी याचे ताब्यातुन एकुण 32,95,500/- किंमतीचा माल ज्यामध्ये 55,690 ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ, एक पांढरे रंगाची एम.एच.14/सी.एस./1150 असा क्रमांक असलेली मारुती सुझुकी स्विफ्ट डीझायर गाडी व 02 मोबाईल जप्त करुन त्याचेविरुध्द दिघी पोलीस स्टेशन येथे गु.र.क्र. 520/2024 एन.डी.पी.एस. ॲक्ट कलम 8(क), 20(ब)(ii)(क), 29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयाचा तपास दिघी पोलीस स्टेशन हे करीत आहेत.*
*सदरची कारवाई मा. विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड आयुक्तालय, मा. शशिकांत महावरकर, सह पोलीस आयुक्त, मा. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, मा.संदिप डोईफोडे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, मा. विशाल हिरे, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे 1, मा. बाळासाहेब कोपनर, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे 2 यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहा पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड पोलीस अंमलदार विजय दौंडकर, गणेश कर्पे, जावेद बागसिराज, मयुर वाडकर, निखिल शेटे, रणधीर माने, निखिल वर्पे कपिलेश इगवे, चिंतामण सुपे व तांत्रिक विश्लेषण विभागाचे प्रकाश ननावरे यांचे पथकाने केली आहे.