खेड/टाकळकरवाडी प्रतिनिधी लहू लांडे आदर्श पी. एम. श्री. जि. प.शाळा टाकळकरवाडीस युनायटेड बेंगलुरू ही स्वयंसेवी संस्था आणि झेब्रा कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकल्प व्यवस्थापक श्री सत्यपाल कांबळे यांचे मार्फत शुद्ध पाण्यासाठी आरओ प्लांट , तीन डिजिटल इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल,10000ली. पाण्याचा टॅंक व एक हॅन्ड वॉश स्टेशन सी एस आर फंडामधून प्राप्त झाले. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांच्या शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटलेला असून दप्तराचे ओझे कमी झाले आहे. तसेच आधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक पातळीचे ज्ञान विद्यार्थ्यांना व्हावे यासाठी डिजिटल इंटरॅक्टिव्ह बोर्ड चा वापर आमचे सर्व शिक्षक करत आहेत. त्यामुळे अध्ययन अध्यापन प्रक्रिया रंजक आणि कृतीदायक होऊन अध्ययन अध्यापनामध्ये उत्साह आणि गती निर्माण झाली आहे. कंपनीचे शाळेच्या मुख्याध्यापिका संजीवनी चिखले मॅडम तसेच व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष सर्व सदस्य यांच्यावतीने आभार मानण्यात आले आणि अशा स्वरूपामध्ये भरीव मदत यापुढे मिळावी अशी मागणी शाळेच्या वतीने करण्यात आली .त्यावेळी शाळेतील अनिता डावरे प्रगती कड सुरेश आदक प्रगती बनकर मनीषा देवरे मंदा आदक शमीम इनामदार पुनम मुळूक खंडू काठे विठ्ठल जानराव राळे मॅडम व सुंदर टाकळकर मॅडम शिक्षक वृंद उपस्थित होते. सर्वांनीच कंपनीच्या सामाजिक बांधिलकीची बद्दल गौरव उद्गार काढले