

लहू लांडे
खेड तालुक्यातील राजगुरुनगर शहरालगत असणाऱ्या सायगाव चे सुपुत्र मेजर प्रशांत विजय बोरकर बालाजी पार्क, राक्षेवाडी येथे सेवानिवृत्ती समारंभ मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. त्यांनी इंडियन आर्मी मध्ये 19 वर्षे सेवा केली आणि एक मार्च 2025 रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांना सदिच्छा शुभेच्छा देण्यासाठी खेड तालुक्यातून आणि सायगाव नगरी मधून अनेक संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कॅप्टन शांताराम राळे, सुभेदार दिलीप ढगे, चंद्रशेखर जाधव, मेजर साहेबराव जाधव, प्रवीण कातोरे, बबन बोराडे अशोक बोरकर, काशिनाथ नरवडे दत्तात्रेय सुक्रे, मेजर गारगोटे आणि आदर्श संगणक तज्ञ संदीप पिंगळे पा. पत्रकार दत्ता भगत उपस्थित होते. तसेच महिला वर्गामध्ये राष्ट्रवादी खेड तालुका सैनिक सेलचे अध्यक्ष वैशालीताई पवळे,सामाजिक कार्यकर्त्या जयश्रीताई ढगे ,धनश्री जाधव , विजया बोरकर, बेबी राळे ,जयश्री पिंगळे ,आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. सेवानिवृत्ती कार्यक्रमाचा समारंभाचा समारोप स्नेह भोजनाने करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभेदार दिलीप ढगे साहेब यांनी केले आणि कार्यक्रमाचे आयोजन नियोजन मेजर प्रशांत बोरकर यांच्या पत्नी प्रमिला बोरकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन सायगाव चे भावी सरपंच अशोक भिकाजी बोरकर यांनी केले.