

प्रतिनिधी दत्ता भगत
जि.प.प्राथ.शाळा रेटवडी येथील विद्यार्थ्यांनी शिवार भेट उपक्रमांतर्गत शैक्षणिक आनंद घेतला. परिसरातील शेती व विविध पिकांची माहिती देण्याकरता प्रत्यक्ष शेतावर जाऊन शेतातील पिकांची माहिती देण्यात आली.येथील शेतीस बारमाही चालणाऱ्या पिकांविषयी माहिती देण्यात आली. शेतात प्रत्यक्ष दर्शी फ्लॉवर, कोबी,टोमॅटो,मका,कांदा व बटाटे इत्यादी पिके विद्यार्थ्यांना माहीत करण्यात आली. त्याविषयी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना माहिती दिली. आधुनिक यंत्रसामग्री त्याविषयी माहिती देण्यात आली. शेतीच्या प्राण्यांना खाद्य यंत्राच्या साह्याने मक्याची कापणी करणारे यंत्र मूरघास कापणी या विषयी माहिती मुख्याध्यापिका सुखदा जगताप यांनी दिली. विद्यार्थ्यांना परिसर माहिती होताच परंतु शैक्षणिक बाबत परिसराची माहिती व अनुभव विद्यार्थ्यांना प्रत्यक्षदर्शी देण्यात आला. शिवार भेट उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना परिसरातील शेती याविषयी माहिती घेण्यात आनंद वाटला.
पुणे जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे, खेडचे गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले, विस्तार अधिकारी दत्तात्रय गोसावी,केंद्रप्रमुख विजय सुरकुले यांनी उपक्रमाचे कौतुक केले आहे. ज्योती सांडभोर,स्मिता पवळे,रोहिदास मांजरे, विजयकुमार शेटे यांनी कार्यक्रमाची व्यवस्था पाहिली