
वाडा – राजगुरूनगर येथील माऊली सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून खरोशी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील दहा विदयार्थ्यांना सायकलचे मोफत वाटप करण्यात आले.
चाकण येथील विशाल गार्डन सोसायटीचे अध्यक्ष कृष्णा सोनवणे, सचिव अनिल राक्षे खजिनदार संतोष चव्हाण तसेच गंगाराम टोपे यांनी सोसायटी मधील नादुरुस्त सायकली गोळा करून त्या सर्व सायकली उत्तम रित्या दुरुस्ती करून घेतल्या आणि गरजु विदयार्थ्यांना पोहोच करण्यासाठी माऊली सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष कैलास दुधाळे यांच्याशी संपर्क साधून सायकल घेऊन जाण्यासाठी विनंती केली.कैलास दुधाळे यांनी खरोशी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका विद्या शिंदे मॅडम यांच्याशी संपर्क केला त्यानुसार
शिंदे मॅडम आणि मुख्याध्यापक बोऱ्हाडे सरांनी शेरेवाडी आणि धारेवाडी येथून तीन किलोमीटर अंतरावून शाळेत येणाऱ्या दहा गरजु विद्यार्थ्यांची लाभार्थी म्हणून निवड केली.
या विदयार्थ्यांना सर्व सायकली देण्यासाठी माऊली सेवा प्रतिष्ठान मार्फत चाकण येथील विशाल गार्डन येथून खरोशी येथे शाळेत आणण्यात आल्या.
विद्यार्थ्यांना सायकल मिळाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद ओसंडून वाहत होता., सायकल वाटप करते वेळी माऊली सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष कैलास दुधाळे, शाळेचे मुख्याध्यापक अनिल बोऱ्हाडे, शिक्षक सुदाम सुपे शिक्षिका विद्या शिंदे, सुषमा भोये, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन कौदरे तसेच सामाजिक कार्यकर्ते वासुदेव गोपाळे, हर्षल शिंदे,
महिला सामाजिक कार्यकर्त्या दीपाली शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.