

आळंदी पोलीस स्टेशन हद्दीतीमधील सराईत रेकॉर्ड वरील आरोपी नामे दिलीप बाबुराव हांगे वय 23 वर्षे रा. वडगाव रोड, आळंदी ता. खेड जि. पुणे यांचा एमपीडीए कायदयांअर्तगत स्थानबध्दता आदेश दिनांक 10/06/2025 रोजी आळंदी पोलीस ठाणे येथे प्राप्त झाला होता. सदरचा आरोपी हा आदेश प्राप्त झाले दिनांकापासून त्याची अटक चुकवण्यासाठी फरार झाला होता. आळंदी पोलीस स्टेशन च्या तपास पथकाकडून फरार आरोपीचा शोध सुरू असतानागोपनिय बातमीदाराने दिलेल्या माहीतीचे आधारे सदर आरोपी नामे दिलीप बाबुराव हांगे यास अत्यंत शिताफीने ताब्यात घेवुन त्यास कोल्हापूर कारागृहामध्ये जमा करण्यात आले आहेण्
सदर कारवाई मा. पोलीस आयुक्त, श्री विनयकुमार चौबे, मा.सह पोलीस आयुक्त, डॉ. शशिकांत महावरकर, मा. अपर पोलीस आयुक्त श्री सारंग आवाड, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 3. श्री बापु बांगर, मा. सहा. पोलीस आयुक्त, चाकण विभाग श्री राजेंद्रसिंह गौर, पिंपरी चिंचवड शहर यांचे मार्गदर्शनानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी एस नरके, तपास पथकाचे अधिकारी अंमलदार यांनी केलेली आहे.