


भारतात गुरू-शिष्य यांची मोठी परंपरा लाभलेली आहे, आपल्या भारतीय संस्कृतीत गुरूला ईश्वराचे स्थान दिले गेले आहे, गुरू आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जात असतात तसेच आई वडील हे आपले पहिले गुरू असतात ते लहानपणापासून आपले संगोपन करतात, आपल्यावर चांगले संस्कार करतात त्यानंतर आपल्याला ज्ञानाचे शिक्षण देणारे शिक्षक हे गुरूस्थानी असतात आणि म्हणून गुरू पौर्णिमा दरवर्षी विविध ठिकाणी, प्रत्येक शाळेत विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते त्याच प्रमाणे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयातही गुरू पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते या कार्यक्रमास विद्यार्थ्यांच्या पालकांनाही बोलावून गुरुंचे स्थान देऊन पुजन दिले गेले. यामुळे आलेल्या सर्व पालकांनी या उपक्रमाला प्रतिसाद देऊन शाळेत हजेरी लावलेली दिसून आली शाळा व्यावस्थापनाचे आलेल्या सर्व पालकांनी मनापासून आभार मानले…