पुणे जिल्हातील ७४ शाळांना शुन्य शिक्षक मिळाल्याने शिक्षक विना शाळा चालवायच्या कशा शासनाला सवाल, २०२४ चा अन्याय कारक संचमान्यंता शासन निर्णय त्वरीत रद्द व्हावा जुनी पेन्शन योजना लागू व्हावी या मागण्यासाठी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर महाआक्रोश मोर्चा

.

Spread the love
प्रतिनिधी : उत्तम खेसे
खेड (पुणे) : ११ जुलै . -शिक्षण क्षेत्रातील विविध धोरणात्मक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळ, संस्थाचालक संघटना, विविध शिक्षक संघटना, शिक्षकेतर संघटना अशा महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातील विविध संघटना एकत्र येऊन शुक्रवार (दि. ११ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्रातील हजारो शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपल्या प्रलंबित शैक्षणिक मागण्या शासनाने त्वरित मान्य करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून शासनाला निवेदन दिले.
शालेय शिक्षण विभागाकडे शासन स्तरावर अनेक शैक्षणिक प्रश्न सध्या प्रलंबित आहेत, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळ, विविध संघटना, शिक्षक आमदार यांनी अनेक वेळा शैक्षणिक प्रश्नसोडविण्यासाठी शासनाला प्रत्यक्ष भेटून चर्चा करून तसेच निवेदन देऊन खालील प्रश्न मांडलेले होते, परंतु अद्याप शालेय शैक्षणिक विभागाने ते प्रश्न न सोडविल्यामुळे मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, शासनाने या प्रश्नाकडे लक्ष द्यावे व शैक्षणिक प्रश्न सोडवावेत यासाठी एक दिवस शाळा बंद ठेवून प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून दिनांक १५ मार्च २०२४ चा संच मान्यता संदर्भातील शासन निर्णय रद्द करावा, शाळा तेथे शिक्षक मिळावेत व मागील २८ ऑगस्ट २०१५ च्या शासन निर्णयाप्रमाणे कार्यवाही करावी, राज्यातील शिक्षकेतर कर्मचारी पदभरती बाबत दिनांक २८ मे २०२५ रोजी शिक्षण संचालक यांनी काढलेले पत्र रद्द करून पदभरतीस मान्यता देण्यात यावी, शिक्षक भरती पोर्टल द्वारे वर्षातून दोनदा करावी, दिनांक ०१ नोव्हेंबर २००५ पूर्वी व नंतरच्या नियुक्त शिक्षक शिक्षकेतर
कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी,१५ मार्च २०२४ संचमान्यतेच्या अन्यायकारक शासन निर्णयामुळे राज्यातील अनेक शाळांना शून्य शिक्षक मिळाले आहेत, पुणे जिल्ह्याचा विचार केला असता पुणे जिल्ह्यातील ७४ शाळांना शून्य शिक्षक मिळाल्याने शिक्षकाविना शाळा चालवायच्या कशा असा प्रश्न मुख्याध्यापक व संस्थाचालक यांच्यासमोर निर्माण झाला असून विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात गेले आहे. त्यामुळे १५ मार्च २०२४ चा संच मान्यतेचा शासन निर्णय त्वरित रद्द व्हावा.
शिक्षकेतर संघटनांनी ११ जुलै च्या संपात सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य अध्यक्ष तानाजी माने तसेच राज्य सचिव राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर यांनी
केले होते. या आवाहनास लाखो शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रतिसाद दिला व आपल्या मागण्या मान्य होण्यासाठी शासनास निवेदन देऊन प्रलंबित प्रश्रांबाबत घोषणा दिल्या.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाने केलेल्या आवाहनास पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ विविध शिक्षक-शिक्षकेतर संघटना, संस्थाचालक संघटना यांनी एक दिवसीय लक्षणीय आंदोलनास प्रतिसाद देत शाळा तेथे शिक्षक मिळावेत यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा काढून निवासी जिल्हाधिकारी ज्योती कदम मॅडम तसेच शिक्षण आयुक्त कार्यालयात शिक्षण सहसंचालक हरून आतार साहेब वशिक्षण उपसंचालक राजेश शिंदे साहेब यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्व माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाचे

राज्य सचिव, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर, सेवानिवृत कुंडलिक आप्पा मेमाणे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघटनेचे प्रवक्ते वसंतराव ताकवले, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रसाद गायकवाड, उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे, माजी अध्यक्ष हरिचंद्र गायकवाड, संस्थाचालक संघटनेचे अध्यक्ष विजयराव कोलते, गणपतराव बालवडकर, महाराष्ट्र राज्य शिक्षकेत्तर संघटनेचे राज्य कार्यवाहक शिवाजीराव खांडेकर, मुख्याध्यापक संघाचे सचिव शिवाजी कामथे, कार्याध्यक्ष राजेश गायकवाड, उपाध्यक्ष कल्याण बरडे, शिवाजीराव कोलते, उत्तमराव निगडे, विजय काकडे, सतिश पिसाळ, पुणे जिल्हा काँग्रेस शिक्षक कमिटीचे जिल्हाध्यक्ष रामप्रभू पेटकर, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सहसंपादक हनुमंत पवार, सहसचिव मोहनराव ताकवले, पदाधिकारी विठ्ठल चिकणे तालुकाध्यक्ष विठ्ठल माळशिकारे, शिवाजी शिंदे, सुनील गायकवाड, राज मुजावर, महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जी. के. थोरात, पुरंदर तालुका अध्यक्ष दत्तात्रय रोकडे, पुणे जिल्हा क्रीडा संघटनेचे सल्लागार सदस्य सोमनाथ उबाळे, शिक्षक परिषद संघटणेचे पुणे जिल्हा (ग्रामीण ) अध्यक्ष निलेश काशिद आदींसह मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित
होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents