

दि.२०/०६/२०२५ रोजी रात्री ०२/३० ते ०३/४२ वा.चे दरम्यान मौजे आळेफाटा ता. जुन्नर जि.पुणे गावचे हद्दीत फिर्यादी सुरेश भगवान खांडगे रा. आळेफाटा ता. जुन्नर जि.पुणे यांचे लक्ष्मी इंटरप्रायजेस दुकानास सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करीत असलेला जगदिश गणेश ततवा वय ४८ वर्षे रा. आळेफाटा ता. जुन्नर जि.पुणे यांस एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधील चार अज्ञात चोरट्यांनी चोरी करणे सोपे जावे म्हणून गाडीमध्ये बसवून घेवून जावून मारहाण करून त्याचा मोबाईल व त्याच्या खिशातील १५००/- रू रोख रक्कम काढून घेवून त्याला बोटा ता. संगमनेर जि. अहिल्यागनर गावच्या हद्दीत सोडून देवून तसेच दुकानाचे लोखंडी शटर उचकटून आत प्रवेश करून दुकानातील ०९,८६,०००/- रू किंमतीचे सिगारेट व गायछाप चोरून नेलेबाबत आळेफाटा पोलीस स्टेशन गु.र. नं १७९/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ (६), ३०५,३३१ (४), ३ (५) प्रमाणे दि. २०/०६/२०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्हयाचे गांर्भाय लक्षात घेता, आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. विश्वास जाधव यांनी पोलीस स्टेशनकडील गुन्हे पथकाला सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचे दृष्टीने सुचना केल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शोध पथक हे सदर गुन्हयातील आरोपींचा व गुन्हयातील वापरलेल्या वाहनाचा शोध घेत असताना, नमुद गुन्हे शोध पथकाला तांत्रिक माहितीच्या आधारे व गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा सलमान सादीख शेख रा. मोमीनपुरा,खाजानगर,बीड .ता.जि.बीड व त्याच्या साथीदारांनी त्यांच्याकडील स्विफ्ट डिझायर कार व इनोव्हा गाडीतून येवून केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली, त्यानंतर नमुद आरोपीचा शोध घेणेकामी गुन्हे शोध पथक हे तात्काळ बिड जिल्हयात जावून आरोपी सलमान सादीख शेख यांस त्याने गुन्हयात वापरलेल्या इनोव्हा गाडी कमांक MH 12 DY 5920 यासह सापळा रचून ताब्यात घेवून त्याच्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली असता त्याने त्याचे इतर ०७ साथीदारासह येवून सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली देवून गुन्हयात चोरी केलेला मुद्देमाल हा त्याचे राहते घरात लपवून ठेवला असल्याची कबुली दिल्याने गुन्हयातील चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच गुन्हयातील दुसरे वाहन मारूती सुझुकी कंपनीची स्विफ्ट डिझायर कार नंबर MH 02 EH 4758 हि जप्त करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
सदर आरोपीकडून त्यांनी गुन्हा करतेवेळी वापरलेली इनोव्हा गाडी कमांक MH 12 DY 5920 व स्विफ्ट डिझायर कार नंबर MH 02 EH 4758 तसेच चोरीस गेलेला “मुद्देमालापैकी ३,९३,४५० रू किंमतीचा मुद्देमाल” असा एकुण ११,९६,४५०/- रू किंमतीचा मुद्देमाल गुन्हयाचे तपासकामी जप्त करण्यात आला आहे सदरची कामगिरी हि श्री संदिप सिंह ३गिल्ल सो. पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, मा. रमेश चोपडे साो. अपर पोलीस अधिक्षक पुणे विभाग, मा. रविंद्र चौधर साो. उपविभागीय पोलीस अधिकारी साो. जुन्नर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. विश्वास जाधव यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर, पो.हवा.विनोद गायकवाड, पंकज पारखे, आमित मालुंजे, पो.कॉ नविन अरगडे, ओंकार खुणे, गणेश जगताप, सखाराम जुबड, प्रशांत तांगडकर, सचिन कोबल यांनी केली आहे.