

मुळशी [ पोमगाव ] :३० जुलै -क्रिकेट , शैक्षणिक संस्था निर्माते , सिनेमा थियटर व्यवसाय इत्यादि क्षेत्रात भरारी घेणारे स्व : आप्पासाहेब तथा सदानंद मोहोळ यांच्या तृतीय पुण्यस्मरणा निमित्ताने
त्यांच्या कार्याला दिला उजाळा .
मामासाहेब मोहोळ शिक्षण संस्थेच्या एकूण ३७ शाखेत स्वर्गीय आप्पासाहेब मोहोळ यांच्या शैक्षणिक, सामाजिक , क्रिकेट क्षेत्रातील कार्याला उजाळा देऊन त्यांचा तृतीय स्मृती दिन साजरा झाला .
मुळशी धरण प्रशाला पोमगाव या शाळेत कार्यक्रम साजरा झाला .स्मृती दिन सभेचे अध्यक्ष सोनवणे बी .एम हे होते . स्व आप्पासाहेब मोहोळ यांचा जीवन पट त्यांनी आपल्या भाषणात सांगितला .
विज्ञान गणित शिकविणारे अध्यापक श्री उत्तम खेसे सर यांनी भाषणात सांगितले स्वर्गीय आप्पासाहेब मोहोळ यांचा सहवास पंचवीस वर्षे आमच्या सारख्या पामरांना पितृतुल्य समान लाभला हे आमचे भाग्य आहे . स्व . आप्पासाहेब यांनी आम्हाला आपुलकी ,प्रेम , .जिव्हाळा माणुसकी दिली .
आम्ही देव पाहिला तो स्व आप्पासाहेबांच्या रूपात . गेली ती देवरूपी विभूती , मागे राही आठवणी जागवया .इयत्ता आठवीत शिकणारी अस्मिता शिनकर हीने ही भाषण केले . कात्रट सानिका हीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या .
प्रसिद्ध निवेदक अध्यापक श्री राजेंद्र नाईकरे सर यांनीही भाषण करून स्व आप्पासाहेब यांच्या प्रतिमेस अभिवादन केले . या कार्यक्रमास वाकचौरे सर’, संतोष आवारी , किरण धायगुडे, भोसले मामा , भाषण करणारे विद्यार्थी , श्रोते विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते