


प्रत्येकाने आपले कर्तव्य निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पाडणे हीच खरी देशभक्ती. *माजी सैनिक साहेबराव जाधव*
दिनांक 26 जुलै वार शनिवार
राजगुरुनगर
आज कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने योद्धा माजी सैनिक संघटन राजगुरुनगर आणि शहीद राजगुरू शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था राजगुरुनगर यांच्या समन्वयाने कारगिल विजय दिवस संपन्न झाला.
कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने योद्धा माजी सैनिक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री साहेबराव जाधव यांच्या समवेत माजी सैनिक श्री दत्तात्रय रामभाऊ टेमगिरे उपाध्यक्ष खरेदी विक्री संघ खेड, माजी सैनिक श्री सयाजी शितोळे सचिव, माजी सैनिक श्री प्रशांत राक्षे संचालक, माजी सैनिक श्री ऋषिकेश आरुडे संघटक, काश्मीर येथे ऑन ड्युटी असणारे सैनिक श्री विनायक म्हसे हे देखील उपस्थित होते.
कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या सर्व सैनिकांना कार्यक्रमाला उपस्थित वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच शहीद जवानांच्या आत्म्याला शांती मिळावी आणि त्यांचं कायम स्मरण देश वासियांना स्मरणात राहावे. म्हणून कारगिल विजय दिवस सोहळा आयोजन संस्थेकडून करण्यात आले. या देशभक्तीपर कार्यक्रमाला शिक्षक प्राचार्य यू के सूर्यवंशी साहेब, शिल्प निदेशक संतोष बिन्नर सर, शिल्प निदेशक अमोल जाधव सर,शिल्प निदेशक श्रेणिक शिरसाठ सर, शिल्प निदेशक एस व्हि दरेकर सर आणि शिल्प निदेशक सी एस साळुंखे सर, आणि व्यावसायिक प्रशिक्षण घेणारे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेमध्ये घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमाच्या निमित्ताने माजी सैनिकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.(निबंध स्पर्धा
प्रथम – स्वस्तिक वहाळ ,द्वितीय – उमेश पांढरपोटे वकृत्व स्पर्धा प्रथम – विशाल लोणकर ,द्वितीय- तेजस गफले) कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने योद्धा माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष श्री साहेबराव जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सैनिकांचे बलिदान हे कायमस्वरूपी आपल्या स्मरणात प्रत्येकाने ठेवले पाहिजे आणि आपल्या मातृभूमीची सेवा प्रत्येकाने केली पाहिजे. यासाठी स्वतः उच्चशिक्षित होऊन समाजामध्ये स्वतःचे एक स्थान निर्माण केले पाहिजे. आणि मग आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून सामाजिक कार्यात देश हिताच्या कार्यात देखील सहभाग घेतला पाहिजे असे आवाहन माजी सैनिक श्री साहेबराव जाधव यांनी केले.
संस्थेचे प्राचार्य श्री सूर्यवंशी सर यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले सर्व माजी सैनिकांचे आभार व्यक्त केले.