

पोमगाव ( मुळशी ) – ता . २३ जुलै सदर कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक सन्माननीय आवारी सर अध्यक्षस्थानी उपस्थित होते विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतुन लोकमान्य टिळक यांचे जीवनपट उजळून दाखवला विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री वाकचौरे सर श्री खेडकर सर यांनी आपले मनोगत व्यक्त केली.अडथळे तर क्षनिक असतात जो धाडसाने त्यांना सामोरे जातो . त्याला आयुष्याचे व्यवस्थापन जमते .आपल्याजवळ काही द्यायला नसेल तर चेहऱ्यावर एक स्मित हास्य दया आणि आपल्या अनुभवाची शिदोरी चा सुखद अनुभव विद्यार्थ्यांना द्या . मी घरचा अभ्यास करीन , ग्रहपाठ करीन , पाठांतर करीन येवढा जरी आज लोकमांन्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंती निमित्ताने बोध घेतला . तरी खूप विश्वासाची गोष्ट विद्यार्थ्यानी घेतली असे उपस्थित असणारे सर्व जण म्हणतील . असे अनमोल मार्गदर्शन उत्तमराव खेसे सर यांनी विद्यार्थ्यांना केले .*कौन,कब किसके लिए महत्वपूर्ण हो जाए,यह वक्त और परिस्थितीयों पर निर्भर करता है*
श्री नाईकरे सर यांनी आपल्या मनोगतातून लहान वयातच लोकमान्य टिळकांनी संघर्ष ही जीवनाची पायरी आहे या संकल्पनेतून अगदी शालेय जीवनापासून संघर्षाची केलेली सुरुवात व त्याचा झालेला फायदा भारताचा संघर्ष लढा सोडवण्यासाठी कसा उपयोगी आला याची माहिती विद्यार्थ्यांना दिली स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच या संकल्पनेतून पेटून उठलेले लोकमान्य भारताच्या जहालवादी गटाचे एक प्रमुख नेते होते लोकमान्य टिळकांना देखील त्या काळामध्ये तरुण वर्गाचे ग्लॅमरस तयार झालं होतं खऱ्या अर्थाने लोकमान्य हे तरुणांचे हिरो होते म्हणून त्यांना लोकमान्य या पदवीने सन्मानित करण्यात आले. भारतात आलेल्या प्लेगच्या साथीवरून त्यांनी सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? हा लेख अतिशय समर्पकपणे लिहिला त्यामुळे त्यांना मंडालेच्या तुरुंगामध्ये शिक्षा देखील झाली तुरुंगात असताना त्यांनी गीतारहस्य नावाचा ग्रंथ लिहिला शेवटी असे म्हणावे वाटते *असा मोहरा झाला नाही पुढे न होणारा बाळ टिळक हे नाव जगात गर्जत राहणार* अशाप्रकारे विद्यालयांमध्ये लोकमान्य टिळक जयंतीचा कार्यक्रम अतिशय उत्साह संपन्न झाला सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री खेडकर सर यांनी केले व श्री वाकचौरे सर यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.